कधी वाटतं गोंधळ कमी झाला आता
नंतर कळतं नवा संभ्रम सुरू होणार आता
कधी वाटतं रस्ता सरळ आहे आता
नंतर कळतं आयुष्य नवं वळण घेणार आता
कधी वाटतं जग सुंदर दिसतयं आता
नंतर कळतं नवं स्वप्न सुरू होणार आता
कधी वाटतं पुष्कळ माणसं जवळ आहेत आता
नंतर कळतं नव्याच कोषात गुरफटणार मी आता
कधी वाटतं किती शांत एकांत आहे आता
नंतर कळतं नवं वादळ येणार आहे आता
कधी वाटतं वादळं पेलायला सरावलोय मी आता
मनातलीच वादळं मन पेलू शकेल काय आता?
नवी वादळं नसतील तर काय मजा? संदीपसारखं ’कंटाळ्याचादेखील मजला कंटाळा येतो..’ व्हायचं!
ReplyDelete:)
haha :) nice
ReplyDelete