Sunday, June 3, 2007

आता

कधी वाटतं गोंधळ कमी झाला आता
नंतर कळतं नवा संभ्रम सुरू होणार आता
कधी वाटतं रस्ता सरळ आहे आता
नंतर कळतं आयुष्य नवं वळण घेणार आता
कधी वाटतं जग सुंदर दिसतयं आता
नंतर कळतं नवं स्वप्न सुरू होणार आता
कधी वाटतं पुष्कळ माणसं जवळ आहेत आता
नंतर कळतं नव्याच कोषात गुरफटणार मी आता
कधी वाटतं किती शांत एकांत आहे आता
नंतर कळतं नवं वादळ येणार आहे आता
कधी वाटतं वादळं पेलायला सरावलोय मी आता
मनातलीच वादळं मन पेलू शकेल काय आता?

2 comments:

  1. नवी वादळं नसतील तर काय मजा? संदीपसारखं ’कंटाळ्याचादेखील मजला कंटाळा येतो..’ व्हायचं!
    :)

    ReplyDelete