आज अचानक पाऊस पडला
तसा तो इथे नेहमीच पडतो
लखलखणार्या सूर्यप्रकाशात अकस्मात ढग दाटून येतात
उभारी घेऊ पाहणार्या मनावर भयाचे सावट आणतात
पाऊस सुरु होतो
नि मी घरात बसतो
पावसाच्या सहस्रधारा कोसळत असतात
अन् मी मनातल्या मनात कोलमडत असतो
पाऊस फक्त पहायचा
अप्रत्यक्ष
भिजलेल्या झाडांवर
भिजलेल्या रस्त्यांवर
भिजलेल्या गाड्यांवर
कुणाच्या रेनकोटमधून टपटपताना
कुणाच्या छत्रीवरून ओघळताना
रस्त्यालगतच्या खड्ड्यांत साचलेला
खिडकीच्या काचांवर दाटलेला
गाडिच्या वायपरने पुसला जाणारा
सोडिअम वेपरच्या प्रकाशात उजळून जाणारा
तसाच तो अनुभवायचा
साध्या डोळ्यांना तो थेट दिसत नाही
मातीचा सुगंध येथे दरवळत नाही
मला वाटतं आज मनसोक्त भिजावं
थंडगार तुषार झेलून शहारून जावं
विसरून जाऊन जग सारं अवखळपणे बागडावं
तन भिजेपर्यंत मन रिझेपर्यंत
नंतर वाटतं भजी खावी
गरमागरम चहा पीत अंगावर रजई घ्यावी
पण ह्यातलं काहीच होत नाही
मी फक्त पाऊस पाहत बसतो
अप्रत्यक्ष
उद्या सकाळी निघताना कदाचित लख्खं ऊन असेल
काळ्याभोर मेघांची दूरवरही चाहूल नसेल
मनातले मेघ मात्र अजून तसेच दाटले असतील
मला व्यापणारी काळी छत्री माझ्या बॅगेत नक्की असेल
आणि जर पाऊस पडणारच असेल
तर तसं इथलं हवामानखातं मला सांगेल
प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारा पाऊस ह्यांना बरा हमखास दिसतो
मी मात्र डोकावून डोकावून त्याचं अस्तित्त्व शोधत असतो
पावसाचं असं हे न सांगता येणं मला मुळीच आवडत नाही
आणि आल्यावर असं गप्प बसणं मला सहन होत नाही
इथला पाऊस सादच घालत नाही
कारण,
इथे पावसाची गाज नाही!
किती होमसिक करतो ना पाऊस? ’होमसिक’ला ट्युलिपनं एक सुरेख शब्द सुचवलाय - घरव्याकुळ..
ReplyDeleteपाऊस घरव्याकुळ करतोच. पण आपण आपलं पद्मजा फाटकसारखं म्हणायचं - ग्रह तर एकच आहे ना इथून तिथून...
मस्त लिहितोयस. Keep blogging.
Hey,
ReplyDeletepahaNarxyaa = पाहणाऱ्या
:)
pahanarya...:(...mazya browser madhe neat disat hota....sudharato...thnx
ReplyDeleteAmazing!! I loved the lines"
ReplyDelete"Tasaach to anubhavaayacha,
Saadhya dolyanna to thet disat naahi,
Maaticha sugandh yethe darwalat naahi..."
Khoopach chhan kavita aahe...this is a concept that has been written about so many times, yet, every time you read a different perspective of it, it influences you. I remember the Charlie Chaplin quote:
"I walk in the rain so that no one can see my crying."