शिशिरागम झाला म्हणुनी
झाडांची पाने गळली
देही जी फुलली वस्त्रे
देहास त्यागुनी गेली
सृष्टीस या वसंताची
चाहूल लागली जेव्हा
चैतन्य भारल्या देही
पल्लवी विलसली तेव्हा
इथेच या खांद्यांवरती
पालवी खेळली होती
इथेच या फांद्यांवरती
रंगांची उधळण होती
पानांसह वृक्षाली ही
पावसात भिजली होती
पानांनी रंग बदलता
रंगात मिसळली होती
शिशिरास कशाने भुलली?
नि काय विचारे गळली?
न उत्तर मागून झाडे
थंडीत गोठुनी गेली
मग पुन्हा पालवी फुटली
झाडांनी वस्त्रे ल्याली
आत्म्यात क्षमेची शक्ती
झाडांच्या कुठून आली?
शिशिरास कशाने भुलली?
ReplyDeleteनि काय विचारे गळली?...
...आत्म्यात क्षमेची शक्ती
झाडांच्या कुठून आली?
काय बोलावे? लिहीत राहा... और क्या...
अर्थात....:)
ReplyDeleteबब्बा, कविता वगैरे?; हे वेड आहे!! पण कविता सुंदर आहेत. तेव्हा keep it up!!
ReplyDeleteare leka... baap ahes tu....
ReplyDeletefarch kaltay tula... :)
keep it up....
निनाद,
ReplyDeleteधन्यवाद! :)
स्नेहल,
हो का?? सुचतं असं काही! धन्यवाद! :)