लाल लाल वाईन होती छान छान चॉकलेटं सगळं काही साग्रसंगीत गोग्गोड गुलाबी तरी झाला ब्रेक अप त्यांचा वॅलेन्टाईनच्या दिवशी
गेले काही दिवस म्हणे त्यांचं पटत नव्हतं तुटक तुटक बोलणं आणि बारीकसारीक खुपणं पण तस्सं काही एकंदरीत नेमकं कळत नव्हतं फेसबुकी भांडणं नि व्हॉट्सऍपवर रुसणं नोटिफिकेशन्सच्या दरम्यान त्यांची चर्चा चालू होती का खटके उडताहेत, याची जाहीर उजळणी निघाला होता विषय म्हणून त्याने जरा छेडलं, “का होतंस काल तू ते आर्टिकल शेअर केलं?” अविश्वसनीय ‘हुह’ तिचं, त्याची ब्लँक स्मायली नोटिफिकेशन्सचे पुढच्या आले ढग एकासरशी मग त्यांचा ब्रेक अप झाला वॅलेन्टाईनच्या दिवशी
“इतकं काय त्या आर्टिकलचं? पटत नसेल तर दे सोडून आर्टिकलवर आपलं नातं का इतकं बसलंय अडून?”
“हल्ली तू फार करतेस. सारखं असलं शेअर करतेस. सतत तुला जिथे तिथे भ्रष्ट आचार दिसतो सरकारविरोधी बोलताना जरा धरबंध नसतो.”
“कमाल आहे, बर्का ड्यूड, एक होता काळ सरकारविरोधी बोलताना तुझ्या जिभेला नव्हतं हाड तेव्हा कधी आपल्यामध्ये शासन आलं नाही, हल्ली जणू नजर त्याची हटता हटत नाही माझी नजर तश्शीच आहे, तुला काय झालंय? नुसतं साधं आर्टिकल ते, इतकं तुला खुपतंय?”
“पूर्वी जरा वेगळं होतं आपलं सरकार भ्रष्ट होतं भ्रष्टाचारविरोधी असणं तेव्हा तसं ठीक होतंं पण आता जरा वेगळं आहे, मी आता न्यूट्रल आहे. न्यूट्रल लोक करत नसतात असले लेख शेअर लेखकावर तुटून पडणं हेच असतं फेअर. तू मात्र आता आहेस फार फार बायस्ड अस्सं कस्सं तुला त्याचं काहीच नाही वाटत?”
“नेटवरची माहिती बरी घेतोस भसाभसा ते नेटही आता न्यूट्रल नाही, मग तू न्यूट्रल कसा? कळतंय का तुला तू किती ऍब्सर्ड बोलतो आहेस? का नकोशी झाल्या मी म्हणून निमित्त शोधतो आहेस?”
“तसा तुला माझ्याशिवाय पर्याय काय आहे?”
“ए हॅलो?? तुझं नक्की म्हणणं काय आहे?”
“पर्याय दुसरा नाही तोवर तू मला सोडू शकत नाहीस.”
“हुह!” (पुन्हा अविश्वासाने)
“की आहे कुणी ऑलरेडी पण तुला स्पष्ट बोलवत नाही?”
“आं?” (वाईन सांडवत)
“ओह! तो द्रविडसारखा दिसतो म्हणायचीस तो… “
(ग्लास आपटत) “अरे काय बरळतो आहेस, अती होतंय आता तुला जणू माझ्याशिवाय कुण्णी मैत्रिणी नाहीत!”
“आहेत, पण त्या फेसबुकवर तश्या फिरकत नाहीत. इंस्टाग्रामवर दिसतात मला, बाकी कुठे नाही.”
“अनबिलीव्हेबल!” (ग्लास आल्मोस्ट फेकून मारत)
“घे या वाईनच्या शेवटच्या थेंबाची शपथ की तुझं नाही काही लफडं”
“वाईन इटालियन आहे. चालते का तिची शपथ?”
यावर तो जेव्हा जेन्युइनली कन्फ्यूज झाला तेव्हाच तिच्या मनामध्ये त्यांचा ब्रेक अप झाला
स्विस चॉकलेट न्यूट्रल होतं म्हणून त्याची शपथ घ्यायची ठरली हसावं की रडावं या गोंधळात तिनेही शपथ घेतली. त्याला तेव्हा एकदम कसं एकनिष्ठ वाटलं मिठीत एकदम घेऊन तिला त्याने प्रमाणपत्रही वाटलं
म्हणाला तो, “आता कश्या सगळ्या शंका मिटल्या.”
“एक मिनिट, पण अजून काही प्रश्न आहेत मला.”
“ठरलं ना आपलं आता प्रश्न विचारायचे नाहीत.”
“केव्हा?”
“आताच नाही का आपण इथे शपथ घेतली तेव्हा”
“तुझ्या रँडम शंका तूच मिटवल्यास तुला वाटलं तेव्हा. मला ‘आपल्याबद्दल’ मुळात बोलायचं होतं ते बोलायचं केव्हा?”
त्याचा नॉनप्लस चेहरा पाहून ती इतकी खळ्ळकन हसली नि चॉकलेट तोंडात टाकून जाता जाता म्हटली, “चॉकलेट मेलं, शपथ सुटली. तुझ्याविषयी उरलीसुरली तीही शंका फिटली.”
बरेच पर्याय खुले ठेवून ती सिंगल लाइफ जगत आहे. सगळी चूक तिचीच होती, असं त्याचं न्यूट्रल मत आहे.
बातमी त्यांच्या ब्रेक अपची तशी लपून नाही राहिली कुणाच्या फीडवर दिसली नि कुणाच्या फीडवर रुसली आपापल्या लाईक्सची लायकी जशी, दिसली तशी तशी जेव्हा त्यांचा ब्रेक अप झाला वॅलेन्टाईनच्या दिवशी
Saturday, February 3, 2018
कारण काळ, होय! बदलतोय
For the times they are a' changin'! (by Bob Dylan)
Come gather 'round people where ever you roam
And admit that the waters around you have grown
And accept it that soon you'll be drenched to the bone
If your time to you is worth savin'
Then you better start swimmin' or you'll sink like a stone,
For the times they are a' changin'!
Come writers and critics who prophesy with your pen
And keep your eyes wide the chance won't come again
And don't speak too soon for the wheel's still in spin
And there's no tellin' who that it's namin'
For the loser now will be later to win
For the times they are a' changin'!
Come senators, congressmen please heed the call
Don't stand in the doorway don't block up the hall
For he that gets hurt will be he who has stalled
There's a battle outside and it's ragin'
It'll soon shake your windows and rattle your walls
For the times they are a' changin'!
Come mothers and fathers throughout the land
And don't criticize what you can't understand
Your sons and your daughters are beyond your command
Your old road is rapidly agin'
Please get out of the new one if you can't lend your hand