वाळूत बांधलेल्या किल्ल्यास त्या अकाली
भिजवून चिंब गेली
वर्षा कुण्या सकाळी
सोसून तृप्त किल्ला आघात तो सरींचा
मृद्गंध क्रंदनाचा
हुंकार तो सुखाचा
शोषित सूर्यकिरणे आर्द्रास त्या दुपारी
पाडी तडे विखारी
त्या कोरड्या किनारी
सोसून तृप्त किल्ला आघात तो उन्हाचा
दुर्दम्य दृढ साचा
एकसंध वालुकेचा
रेषा कषाय श्रांत क्षितिजी कुणी चितारी
आकुंचल्या किनारी
लहरी उनाड भारी
वाळूस सुप्त होई नवस्पर्श बालकाचा
तो स्पर्श चेतनेचा
संकेत सर्जनाचा
किती क्षमाशील सहनशीलता आणि त्यातून रुजून येणारं सर्जन दिसत असतं तुला आसमंतात. एकेकदा हेवाच वाटतो मला! लिहीत राहा...
ReplyDeleteबाय दी वे -
क्रंदन म्हणजे? आक्रंदन माहीत आहे. पण क्रंदन?
आणि कषाय म्हणजे मला वाटतं- चूकभूल देणे घेणे! - भगवा. त्यामुळे इथे मला संदर्भ कळला नाही.
मेघना,
ReplyDeleteप्रतिक्रिया आवडली. धन्यवाद!
कषाय म्हणजे केशरी/भगवा. संध्याकाळ रंगविण्याचा प्रयत्न आहे.
क्रंदन म्हणजे रडणं...असा शब्द नाही का मराठीत? तुझी शंका पाहून मी online संस्कृत - इंग्रजी शब्दकोश पाहिले एक दोन. त्यात "क्रंद्" असा धातू सापडला नि त्याचा - to cry, to lament - असा अपेक्षित अर्थही सापडला. पण आता तू शंका उपस्थित केल्यामुळे मी माझ्याजवळच वीरकरांचा सुबोध मराठी - इंग्रजी शब्दकोशही पाहत आहे. त्यातही "क्रंदन" असा शब्द आहे नि त्याचा अर्थ crying, weeping, sorrow, lamentation असा दिला आहे. "आक्रंदन" याचाही अर्थ हाच आहे पण माझ्या अंदाजे त्याची तीव्रता अधिक आहे "क्रंदन"पेक्षा. काय वाटतं तुला ?
बहुतेक. आता एवढं केलंच आहेस तर ’आ’ या प्रिफिक्सचे अर्थपण पाहा, म्हणजे स्पष्टच होऊन जाईल.
ReplyDeleteकसला मॅड आहेस तू! काय काय करत असतोस!
I did that...That is why I said it has same meaning. I just feel it has more intensity. :D
ReplyDelete