धगधगत असशील लालबुंद निखारा होऊन,
नाही असशीलच,
कारण ह्या सकाळीसकाळीच्या मुक्तगार हवेतही
धुमसतोय धुराचा कोंदटपणा
पण तेवढंच.
त्याहून अधिक पेटून उठण्याचा प्रश्नच नाही,
कारण स्वतःला स्वतःचीच राख लावून
विझण्याचा स्वभाव आहे तुझा.
म्हणून तुला असं अधूनमधून चुचकारावं लागतं
गोंजारून एक फुंकर घालावी लागते.
फुंकरच तुझ्या वर्मी लागते हा काय माझा दोष आहे?
तुझा हा स्वभाव ते चांगलाच ओळखतात.
भडक्याची भीती नाही म्हणून.
आपली पोळी शेकायला तेवढी धग पुरेशी असते.
पण ती लागतेच.
त्या त्यांत तूही आहेस नि मीही.
त्यामुळे तुला धगधगत ठेवण्यात आपला स्वार्थ आहे.
भडकू नकोस असा तेल ओतल्यासारखा
कारण मला भडका नको आहे.
म्हणून तर मी फक्त फुंकर घालतोय.
भडका उडला तर फक्त राख उरेल
त्या बुळबुळीत राखेचा कुणालाच काहीच उपयोग नाही.
मला तू धगधगताच हवा आहेस.
फक्त मला तुझ्या धगीवर शेकून मस्तवाल झालेल्यांना
"हाय हाय" म्हणत हाय खावी लागेल
असा तू जिवंत जळता हवा आहेस.
तुझी राख झटकण्यासाठी
नि तुझ्यावर फुंकर घालण्यासाठी
तुला मी लागू नये असं मला हवंय.
कारण, मलाही तुझ्याबरोबर तुझ्यासारखंच
तू होऊन पेटतं रहायचं आहे,
पण...
शोले ते डार्क नाईट मार्गे डोंबिवली फास्ट जतन केलेला
तुझ्यातला सलवा जुडूम परजत
थंड राहून "पेटा पेटा" म्हणत
कुणी लावलेल्या आगीत पतंगाप्रमाणे झेपावत
मरत मरत जगण्यापेक्षा जाळून टाका म्हणत
"जळा जळा" करीत
चराचर जाळत फिरशील
तर मला तुमच्यात धरू नकोस.
आधी शेकू देत होतास, आता जाळू पाहतो आहेस.
ह्यांच्या मधलं पेटणं तुला कळेनासं झालंय बहुदा.
उडलेला भडकासुद्धा केव्हातरी शमेल
नि तो शमल्यावर भस्म होऊन राहिलास
तरीही त्या राखेतूनही उभं राहण्याची ऊर्मी गोळा करू पाहशीलच तू
मग तेव्हा कदाचित कळेल तुला
की उभं रहायलाही एक आकार लागतो
जो तुला कधी होता हे तुला कळणारही नाही
कारण ते कळायला तू तूच राहिला नसशील.
तुला दिसणारं सुबक शिल्प घाव घातल्यावरही दिसेल का
ह्याचा विचार
त्या कभिन्न पत्थरावर घाव घालण्यापूर्वीच तुला करावा लागेल.
किमान मागे वळून पाहता यावं म्हणून तरी
तुला तुझं स्वरूप व स्व-रूप सांभाळावंच लागेल
ऊब आणि जाळ
ह्यांच्यामधलंही काही त्यात ज्वलंत असण्याची शक्यता आहे,
एवढंच माझं तुला सांगणं आहे,
मागे वळून पाहताना.
"स्वतःला स्वतःचीच राख लावून विझण्याचा स्वभाव आहे तुझा.", "फुंकरच तुझ्या वर्मी लागते हा काय माझा दोष आहे?"
ReplyDeletehe layy bhaari zalaye. GOD level chya pohochalelya oLi aahet. puDhachi kavita maatr tya manane kami grip ghete, lavkar sampavali asati tar punch mast ala asata.
pan aso.. bha.po.!! laDh!
Great! adhichihi mast hoti. ekach post kay eka panavar? adhicha miss jhala asel kahi tar samajat nahi patkan.
ReplyDeleteबाप रे! हे कसलं भीषण आहे. जबाबदार आणि बंडखोर दोन्ही एकाच वेळी असण्याची मागणी. नुसतीच जबाबदारी असेल, तर ते बुळेपण. आणि नुसतीच बंडखोरी असेल तर ती वाटमारी. दोन्हीमधे कदाचित शोषणाचं आश्वासनही. पण दोन्ही एकत्र असेल, तरच आहे काहीतरी आशा, असंच ना?
ReplyDeletemeghana mhantey tasach mhanycha aahe na??
ReplyDeletedanger ahe ki kavita!!!
Superb! Perhaps this would rank among your top 3 posts thus far.
ReplyDeleteSG
@ सर्किट,
ReplyDeleteअनेकानेक आभार! अघळपघळपणाचा वाण लागलाय खरा! खूप आभार.
@ ट्युलिप,
धन्यवाद! केलीय सुधारणा, अनेक पोस्ट दिसताहेत आता एकाच पानावर! :)
@ मेघना,
हं. काहीसं तसंच. नुसतीच जबाबदारी असेल तर बुळेपण, पेक्षा मी म्हणीन नुसताच अगतिकपणा असेल तर बुळेपण.
तुझा शोषणाच्या आश्वासनाचा मुद्दा भारी आहे. एकात शोषित असणं आहे, नि भडक्यात बहुदा शोषक व शोषित दोन्ही असणं, नाही? हे बहुदा नकळत मांडलं गेलं. पण तू छान explicitly मांडलंस.
साधारणपणे, ममता ब॓नर्जीने लोकांना ही कविता वाचून दाखवायला हरकत नाही, ना?
@ स्नेहल,
मेघनाला म्हटलं तेच. दोघींचेही आभार.
@ शंतनु,
थँक्स अ लॉट!
mast!
ReplyDeleteKaveela tyachya kavitecha arth vicharu naye khare tar, pan
ReplyDelete'तुझ्यातला सलवा जुडूम परजत'
ya olee mule majha jara gondhal hotoy!
नेमकं काय अडलंय? सलवा जुडूमबद्दल जुजबी माहितीः http://en.wikipedia.org/wiki/Salwa_Judum
ReplyDeleteउशीरच झाला नाही कॉमेन्टला? असो
ReplyDeleteतुझ्या बाकी कवितांपेक्षा वेगळी आहे. मला फक्त :"शोले ते डार्क नाईट मार्गे डोंबिवली फास्ट जतन केलेला" हे कडवं (!) नाही आवडलं. थोडं प्रचारकी आणि उपरे संदर्भ वाटले.
काय भन्नाट आहे कविता...
ReplyDeleteतुम्ही एकदम भारी लिहिता... तुमचे मागच्या सगळ्या पोस्ट वाचून काढल्याशिवाय आता स्वस्थता येणार नाही...