अशी सांज संध्याकाळीच यावी
अशी गाज भरतीवेळीच यावी
जशी हाक हाकारल्याविण ये
निळ्याशार गगनी शुभ्राभ्र यावा
असा नील गगनी आषाढ यावा
जशी आत ती घेतल्याविण ये
असा गंध हलका तो दरवळावा
असा थेंब हळवा तो भुरभुरावा
जसा नाद ती बोलल्याविण ये
असा सोनचाफा बहरून यावा
असा आमराई मोहोर यावा
जसा होय हुंकारल्याविण ये
अशी रात रात्री हलके मिटावी
अशी मंद्र झोपेत पहाट व्हावी
जसा शब्द मी सुचविल्याविण ये
मंद्र म्हणजे काय? हे गाण्यातलं काहीतरी आहे ना?
ReplyDeleteमला सगळ्या कडव्यांचा शेवट प्रचंड आवडला, पण आधीच्या दोन-दोन ओळी मात्र तितक्याश्या नाही आवडल्या.
पण खूप दिवसांनी कविता. (किंवा प्रतिक्रिया लिहायला वेळ आणि उत्साह असताना खूप दिवसांनी कविता!) हे एकदम बेष्ट!
@ मेघना,
ReplyDeleteगाण्यातलं खालचं सप्तक. मंद्र,मध्य, तार पैकी. मला आवडतो हा शब्द खूप :-)
तुला नेमकं ते आवडलं, हे अजून बेष्ट. :)