ते नाते कधीच नव्हते
मैत्रीचे कसले बंध?
वार्याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंध
मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते
कुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे
मौनाने स्पष्ट करावा
मस्तकात भिनला पारा
तुज मात्र सोडून भगवा
वाटला अबोली तारा?
वागेन कसाहि कधीही
हे बंधन अतूट गमते
डोहात ठरेना तारा
अन रिती अंजली भिजते
का मला कधी ना कळले
मैत्रीचा नसतो रस्ता
मग धूमकेतू दुरूनी
सूर्याशी आला नसता
त्या रस्त्यावर भर दिवसा
मी मुक्त मनाने हसलो
फसलो मी, कळले मी त्या
सूर्याला मित्र समजलो
मग हेही मला उमगले
सूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी
तेव्हा मैत्रीची सारी
व्याख्या एकेरी झाली
एकाची मैत्री झाली
एकाने मैत्री केली
ना कधी गायली कोणी
मैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे
सही :)
ReplyDeleteKhupach vegli jhali ahe kavita.
ReplyDeleteमग हेही मला उमगले
ReplyDeleteसूर्याला नाही वैरी
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी
सहीच...पण नक्की काय शिजतय?
आणि हो, १-२ ठिकाणी छंदात गडबड झालीए. पण शेवटी तो छंदच, चालायचंच
@ संवेद,
ReplyDeleteकुठे गडबड झाल्या? मी मोजून पाहिलं परत, सगळ्या ४० ओळींत १४ मात्राच आहेत, unless, मी काहीतरी गोंधळ घालतोय.
एकाची मैत्री झाली
ReplyDeleteएकाने मैत्री केली...
त्याच्या अस्ताशी झडती
स्तोत्रांच्या सावध फैरी....
खूप बाळबोध आणि खूप क्वालिफाईड आचरट प्रश्न विचारू? पण दुसरं काही सुचत नाहीय आणि राहवतही नाहीय - तुला कसं सुचतं रे? :)
जियो....
hey..so sorry माझंच मोजण्यात चुकलं कुठं तरी. मी मिटर बघत होतो आणि अचानक व्याकरणात घुसलो. सपशेल माफी असावी सरकार
ReplyDeletemast jhaley bhau! sahi hai!
ReplyDeletewa, too good!
ReplyDeleteMitra,
ReplyDeleteBrett Lee was enquiring once again!
Shantanu
@यशोधरा, संग्राम, सुमेधा
ReplyDeleteधन्यवाद!
@आनंद,
वेगळी!...पण बरी, वाईट की नुसतीच वेगळी? :)
@मेघना,
एक तितकंच अचरट उत्तरः "कुणास ठाऊक?" :(
एक खत्रुड उत्तरः "तुला सुचतात ना विशेषणं, "सूर्यफूलसदृश तत्परता", "गाडीला पाहून सरसावून उभा राहणारा प्लँटफाँर्म" वगैरे वगैरे तस्संच!" :)
आभार! :)
@संवेद,
एक आगाऊ खत्रुड उत्तरः "कृपया हे तू विचारू नकोस...असले प्रश्न तुझ्यावर उलटवयाचे "सूडदार" विचार येताहेत मला. तुझ्याच भाषेतः "Let the riddle be riddle"" :P
पण काय शिजतंय, हे यथावकाश पुन्हा केव्हातरी!
---छंद: sorry वगैरे काय...no problem!
@Shantanu,
is he playing in IPL? :)
ना कधी गायली कोणी
ReplyDeleteमैत्रीची सहस्र नावे
मंतरल्या काळासाठी
'भूत' एवढेच म्हणावे
Apratim!!!
Khoopach chhan! Very different concept.
ReplyDeleteते नाते कधीच नव्हते
ReplyDeleteमैत्रीचे कसले बंध?
वार्याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंध
मी उगीच भावुक होतो
मैत्रीस समजून नाते
वार्याशी खेळुन सुकते
रानात तृणाचे पाते
Aha......kaay mhaNu ajUn?
@Snehal, Tapasya, Manish -
ReplyDeleteThanks a lot!
ते नाते कधीच नव्हते
ReplyDeleteमैत्रीचे कसले बंध?
वार्याला अजून स्मरतो
सुकल्या जाईचा गंधकुठल्या नियमाच्याधारे
मैत्रीचे नाते व्हावे?
वाहणे सुकेना म्हणुनी
पाण्याने पारा व्हावे
sundarrrr.........
आता लिहा की पुढे
ReplyDeletemaitreene maitreesathee, gayalee asheehi viraanee!
ReplyDeletekhoop chhaan- harshuchi aaee