तो बुंद टपोरा गोळा
संतूर भारल्या वेळा
दीठीत रक्तिमा तान्हा
ना दिपल्या अजून ज्वाळा
ती फेनफुलांची दुलई
गुरफटून जलधी घेई
पुळणावर उठून बसली
माडांची तिरकी राई
क्षण राग उषेचा गावा
नि निरोप निशेचा घ्यावा
जग प्रसन्न म्हणते ऐसा
दूरून दिसे देखावा
तो मधला साहिल माझा
तो अलिप्त म्हणून माझा
देखाव्यात हरवलेला
बंदिस्त किनारा माझा
सौंदर्य जळाचे दिसले
अन रंग नभाचे टिपले
माडांच्या पार्श्वी कोणी
अन गृहीत त्याला धरले
कुणी ठाव त्याचा घ्यावा
त्याच्याही जावे गावा
अंतरात शिरून त्याच्या
भावही जरा देखावा
तो उदासवाणा नाही
देखावा जरूर पाही
पण भ्रामक प्रसन्नतेची
व्याख्या त्या माहित नाही
ती लाट फुटे एखादी
सोडून सख्यांची गर्दी
तो भिजतो अन ती रुजते
क्षण तेवढेच संवादी
क्षण चिंब तो ओघळावा
उत्स्फुर्त रंग मिसळावा
विस्कटल्या चित्रामधुनी
रंगतो खरा देखावा
Chala.. pahili comment mazee!
ReplyDeleteThis is 'Outstanding'
Arre and whats the copyright thingi on the left pan?
Shantanu
'तो उदासवाणा नाही
ReplyDeleteदेखावा जरूर पाही
पण भ्रामक प्रसन्नतेची
व्याख्या त्या माहित नाही...'
समर्पक. निव्वळ समर्पक. उग्गाच आचरट आशावादी नाही आणि काळंकुट्ट उदासही नाही.
'... माडांच्या पार्श्वी कोणी
अन गृहीत त्याला धरले...'
'...तो भिजतो अन ती रुजते
क्षण तेवढेच संवादी...'
'क्षण चिंब तो ओघळावा
उत्स्फुर्त रंग मिसळावा
विस्कटल्या चित्रामधुनी
रंगतो खरा देखावा'
छ्या! नुसत्याच तुझ्या ओळी उद्धृत कराव्या लागतील. हे काही खरं नाही.
'आत्म्यात क्षमेची शक्ती झाडांच्या कुठुनी आली?' ची आठवण झाली. शैली सारखी आहे म्हणून, की त्यातली अफाट जाण, आपलेपणा आणि अलिप्तपणा इथेही आहे म्हणून? कुणास ठाऊक.
धिस वन इज अ मास्टरपीस.
Wah!!! Surekh!
ReplyDeletesundar!!!!
ReplyDeletekhrach its a masterpiece!!
@ Shantanu, Meghana, Anand, Snehal,
ReplyDeleteThis is overwhelming...मनापासून आभार!!!
@ मेघना,
बहुदा दोन्ही. तू म्हणलीस म्हणून मी जरा परत वाचलं मागचं, "बुंध्याला ओळखणारा मी तो कृतार्थ माळी" मध्येही वाटलं होतं का तुला तसं? एक कुतूहल, काय वाटलं हे जाणून घ्यायचं.
पण ह्या अशा मागच्या ओळी तुझ्या लक्षात वगैरे राहिल्यात हे वाचून अगदी धन्य धन्य झालं मला... अफाट कौतुकाबद्दल अफाट आभार. :)
देअर यू आर!
ReplyDeleteआणि 'किल्ला... तृप्त हुंकार...' असं कायसंसं असलेली कविता कुठली? त्यातही.
'विपरीत नियतीचे संदर्भ शोधणारा
अंधार सांधणारा मी आत्मसिद्ध तारा...'
यापण लक्षात राहून गेलेल्या ओळी. पण त्या वेगळ्या सुंदर.
असो. आता पुन्हा वाचताना नव्यानं आलेली एक शंका - त्या रंगबदलाचं काय प्रयोजन? निवेदक बदलतो आहे की त्याचा मूड? की आय हॅव मिस्ड दी पॉईंट कम्प्लीटली? प्रत्येकाला आपापली एक निराळीच कविता भेटते हे खरं अखेर!
@ Meghana,
ReplyDeleteरंगबदलाचं प्रयोजन एकच - लहर.
हा एक गद्य निबंध असता तर बहुदा त्या "देखाव्या"ने संपणार्या तीन तीन कडव्यांचा मिळून एक असे तीन परिच्छेद झाले असते बहुदा. कवितेत कसे पाडायचे मुद्दे कडव्यांच्या उपर?...आली लहर बदलले रंग.
तसं काहीच उदात्त प्रयोजन नसल्यामुळे....कायपण अर्थ काढा....
असं वाटतय तू पुळणीवर ब्रश अन कॅनव्हास घेऊन बसला आहेस.
ReplyDelete"तो मधला साहिल माझा
तो अलिप्त म्हणून माझा"
अप्रतिम...
"शब्दांच्या तरल धुक्यातुन
जलतरंग सागर माझा"
@ Samved,
ReplyDelete:)...the events that triggered this...yes I was sitting on the beach...brush-canvas shabdanchach...
jalatarng sagar maza..tevha to asa maza vaTat navata khara tar...
Thanks!
क्षण चिंब तो ओघळावा
ReplyDeleteउत्स्फुर्त रंग मिसळावा
विस्कटल्या चित्रामधुनी
रंगतो खरा देखावा>>.
surekh!!!! kavitaa faar surekh aahe.