Tuesday, May 20, 2008

निवांत क्षणांचे अन्वयार्थ किंवा असंच काहीतरी...

डोहात तरंगे काच, अन व्योम व्यापते नीळ
फुंकरही व्हावी वात, अन फूल घालते शीळ
संन्यस्त कातळावरली ती गजबजलेली वेळ


त्या खडकापाशी आज क्षण शांत भेटले चार
बाष्पास दिसावे सहज घन सांद्र, गोठले, गार
पाऊलखुणांचा तेथे काळाशी जुळला मेळ


त्या स्तब्ध ठिकाणाहून कितीदा गेलो नि आलो
पण काळ थांबला स्तब्ध, तेव्हाच स्तब्ध मी झालो
क्षण सुन्या फलाटापाशी ती धुक्यात थबके रेल


स्मरतात वायफळ सूर, रेंगाळत येता सांज
ते चर्च सांगते वेळ, राउळी वाजते झांज
नि आर्त सूरांनी सजते मशिदीत शुभ्र ती वेल


निःशब्द, असेच निवांत क्षण हळूच उमलून यावे
अनन्वयच त्यांची खूण, भय त्यांच्याशी विसरावे
हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ

12 comments:

  1. sahIye.. mastach. :-)

    pan madhech thambalya sarakha vatataye, shevaTacha kaDawa rahun gelaye lihayacha jaNu.

    ReplyDelete
  2. Beautiful!!! Your choice of words is very impressive.

    ReplyDelete
  3. सुरेख. ही कुठल्या वृत्तातली रचना? तीन ओळी सहसा कमी येतात पाहण्यात. 'रेल'च्या वापरामुळे एकदम गुलजारांची आठवण झाली. तेपण असेच बिनदिक्कत सहजपणानं इंग्रजी शब्दांना उंबर्‍याआत घेतात, नाही?

    ReplyDelete
  4. मस्तच मस्त...

    निःशब्द, असेच निवांत क्षण हळूच उमलून यावे
    अनन्वयच त्यांची खूण, भय त्यांच्याशी विसरावे
    हा निमिषांचा निमिषांशी निमिषार्धासाठी खेळ

    आहाहा....

    ReplyDelete
  5. @ circuit,

    Thanks. paN ananvay hich khooN aahe na re!

    @ anand,

    Thanks a lot:)

    @Meghana,
    Thanks. Vrutta-bitta mahit nahi kaye te...vruttachi lakshaNa sangu shakato paN tyala kahi nav aahe ka kon jane...
    gulzar yanchi aathavaN....dhanyavaad!! :)

    @ Samved,

    Thank u! :)

    ReplyDelete
  6. छान.
    पण मला तर सारखी बा. भ. बोरकरांच्या कवितेची आठवण येत होती. कुणालाच साधर्म्य जाणवले नाही का?

    ReplyDelete
  7. @ Ashwini*,

    Thanks..

    kuthali kavita? mala borakaranchya far kami mahityet...so asel kuthe online tar aawadel vachayla.

    ReplyDelete
  8. Mast. Shevatachi oL vishesh aavaDali.

    ReplyDelete
  9. बास की राव आता सुट्टी... आमी वाट बघायलोय.

    ReplyDelete
  10. Beautiful. The last line is really too good.

    ReplyDelete
  11. @ नंदन, तपस्या

    धन्यवाद!

    ReplyDelete