पण तो जिंकेल तेव्हा एवढं वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं
द्वेष पसरवून जिंकता येतं असं?
सर्व काही आलबेल असल्यासारखं, अनिरुद्ध, द्वेष, दहशत नि विजयोन्माद
नि माझे अडखळलेले शब्द.
नवीन काहीच नव्हतं
फक्त ते इतिहासातून वर्तमानात आलं होतं
नि मी तेव्हा तिथे होतो एवढंच.
कसं जमतं काळाला हे असं बारीक सारीक अलगद पकडून पुन्हा पुन्हा उभं करणं?
हे असं उभं करत करत फक्त पुढे जाणारा काळ
नि माझे अडखळलेले शब्द.
हुकूमशाहीच्या उदयाची कारणे
भ्रष्ट प्रशासन, लोकनियुक्त प्रतिनिधींवरचा उडलेला विश्वास इ.
उत्प्रेरकेः
आत्यंतिक राष्ट्रवाद, द्वेष
हीच गोष्ट मी जर्मनीतल्या हिटलरची म्हणून वाचली होती.
ती गुजरातमधल्या नरेंद्राची म्हणून पुन्हा पाहिली इतकंच.
सारं काही माहित असलेलं
कृष्णधवल चित्रांतून आता रंगीत चलचित्रात दिसावं
नि माझे अडखळलेले शब्द.
कशी जुनीच गोष्ट नवीन वाटते
कधी बाहेर पडू नये असं वाटतं
नि कधी बाहेर पडण्याचा मार्गच दिसेनासा होतो.
हतबलतेचा कडेलोट
नि माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.
खरंय. काय होणार यातून कुणास ठाऊक... विचार करायचीपण भीतीच वाटते.
ReplyDeleteवा! आधीच पोस्ट आणि हे दोन्ही खूपच प्रभावी झाले आहेत.
ReplyDelete@मेघना, राज,
ReplyDeleteप्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
हा विषय मला स्तंभित करणारा आहे.
ReplyDeleteपण तुम्ही बर्याच लोकांच्या भावना अचुक पकडल्या आहेत.
Read both the posts, but it was a difficult marathi read for me :(
ReplyDeleteLoved the concept of the poem...and the repetitive effect of 'ni majhe adkhalalele shabd' was very rythmic.
The stanza "Kasa Jamate KaLala..." is just too too good.
@kasakay,
ReplyDeletekharach ha vishay stambhit karNara aahe. aaplya pratikriyebaddal aabhar.
@tapasya,
oh..sorry to know it was a difficult read...but, thanks a lot for your comments!
kharay! :(
ReplyDeletepan hya sathi fakt bhrashTa lokpratinidhi hech ek karaN naahi. bharat mahasatta honyachi swapne pahat asatana saare nete maatr kaNa nasalele, bhitraT aNi lobhi disatat. asha veLes navya swapnanni pachhaDalelya janatela taaTh maanecha neta hava asato.
jyanni modi la nivaDun dila, tyapaiki bahutanshi lokanna tyachya dangalinna support karaNyacha raag aahe. paN hindu asaNyachi laaj vaTaNya aiwaji abhimaan vaTaNara neta hava mhanun tyala nivaDun dila.
hopefully, modi swat: suddha he jaNato. tyamuLe tyane track badalala development kade. ani yapudhe hi to kadhi 2002 chi punaravrutti karayacha dhaDhas karaNar nahi.
matadanatun tyala 2002 chya dushkrutyanbaddal shiksha miLu shakali nahi; hopefully nyayalaye tari tyala yogy ti shiksha detil.
@सर्किट,
ReplyDeleteस्वप्न दाखवणारा नेता हे सुद्धा ओघाने आलंच. तू जे लिहिलं आहेस ते दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात जसंच्या तसं सापडेल हुकूमशाहीचा उदय या प्रकरणात. नि तू म्हणतोयस ते बरोबरंच आहे.
पण काय आहे ना मला मोदीची भीती नाहिये. तो भले पुन्हा दंगल करणार नाही. पण जेव्हा तो म्हणतो की गुजरातच्या भूमिवर कोणाकडे शस्त्र असतील नि तो गैर कारणासाठी वापरणार असेल तर त्याचं काय करायचं तेव्हा जे लोक खालून "मारून टाका" असं ओरडतात ना मला त्यांची भीती वाटते.
आपण राजकीय प्रक्रिया, आर्थिक विकास यांत "सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता" या मूलभूत तत्त्वांना सोयीस्कर विसरतो आहोत याचं वाईट वाटतं. स्वप्नं माणसाच्या जीवांपेक्षा मोठी आहेत का?
जवळपास सर्व हुकूमशाही सत्ता लोकशाही मार्गांनीच उदयास आल्या. इतिहासातून शिकून हे थोपवणे न जमल्याचं आणि "History repeats itself" एवढंच म्हणत बघत बसावं लागतंय याचं दुःख अधिक आहे.
न्यायालयांकडून माझी काही फारशी अपेक्षाच नाही. त्यामुळे तुझ्या आशावाद स्तुत्य आहे पण मला बिलकुल आशा नाही.
where are you???
ReplyDeletekhoopech ushira wachlay mi he...:(
ReplyDeletepan tarihi i want to comment... jevha shiwaji park chya sabhechi jahirat karnaari posters pahili na tevha mala asach watla hota ...hatash... chid, rag yahi palikadcha hatashpana....
@Snehal,
ReplyDeleteसमजू शकतो. खूप स्वाभाविक आहे. अजून आपण पशू झालो नाहीत ह्याचा पुरावा आहे, अजून काय !