Thursday, January 24, 2008

नव्याने तेच!

आर्त मी गातो तराणे, सूर हा आहे नवा
शर्थ ही आहे पुराणी, नूर हा आहे नवा


ह्याच सूर्यातील अग्नी वाहणारा तो दिवा
रोज त्याचा उदय तोची, दूर हा आहे नवा

"थांबला तो संपला" हा बोल का आहे नवा?
रोखतो काळास जो, तो शूर हा आहे नवा

मारणारी तीच शस्त्रे, त्याच मर्त्य जाणीवा
धार काढे अमर, ऐसा क्रूर हा आहे नवा

तेच गाणे पावसाचे, तोच 'दर्दी' पारवा
वाहणार्‍या त्याच जखमा, पूर हा आहे नवा

6 comments:

  1. I think, "Teych gaaNe..." was the pick. The couplet has so many interpretations...I wonder which one relates to the context best.

    ReplyDelete
  2. Brett Lee just called up in between the ongoing test match.
    Could you let him know your fees for teaching him 'how to deliver bouncers'!!

    Please feel free to delete this comment, should you find this inappropriate to put it on your blog.

    SG

    ReplyDelete
  3. @तपस्या

    धन्यवाद. मलाही सर्वांत आवडलेलं कडवं तेच आहे.

    @SG

    ओव्हरचा पहिला होता असं समज नि सोडून दे. सगळ्या गोष्टी बँलन्स शीट सारख्या सरधोपट नसतात ना. सामाजिक शास्त्राचा अधिक अभ्यास असणार्‍या तुला माझ्यापेक्षा हे अधिक चांगलं माहित असेल. कधीतरी तुलाही हे आवडेल अशी आशा करतो. सध्या तुला तो बीमर वाटत असेल तर दिलगिरी !

    and why should I delete it? all comments are welcome. comment moderation is just to avoid spam.

    @राज

    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  4. तेच गाणे पावसाचे, तोच 'दर्दी' पारवा
    वाहणार्‍या त्याच जखमा, पूर हा आहे नवा

    wow...

    ReplyDelete