मी उन्हात होती प्याली
छाया ती वृक्षाखाली
ती ऊब शांत छायेची
पानांसह गळून गेली
जी ढगांत दडली माया
वर्षते पुरावा द्याया
शिशिराच्या मेघीं भोळी
गोठून जाय ती वाया
मी उन्हात होता प्याला
बर्फाचा काळा गोळा
त्याने थंडावा पोटी,
हिमवर्षावाने गोळा
ही वणवण नवीन नाही
ऊनही कोवळे नाही
पण शिरिषावाणी मोठी
शिशिराची माया नाही
.....
जी विहिर एकेकाळी
तापल्या उन्हाचीसुद्धा
तहान शमवत होती,
ती शाल हिमाची ओढून
पोटचे पाणी दडवून
गुपचूप बैसली होती.
.....
बाहेर विंटर सुरु झाला आहे, नावापुरता दिवस आहे अन्यथा अंधारच अधिक माजला आहे, लवकरच स्नो पडणार आहे, तुम्ही आधीच जरा वैतागलेले किंवा निराश आहात असल्या परिस्थितीत ही कडवी पडली. त्यातून काहीच घडेना. म्हणजे पुढे काहिच नाही. उगीच आपलं स्वघोषित नैराश्य कुरवाळत बसायचं...मग तेच ते नि तेच ते निरनिराळ्या उपमा देत बरळत बसायचं...सुचेल काहितरी यातून अधिक गहिरं वगैरे...म्हणजे काय? याहून भीषण की उगीच "sugar coated weakness" सारखी त्याला उदात्त किनार द्यायची, का "हेही खरेच आहे" असली अगदीच अलिप्त वाक्यं फेकायची? समजेना म्हणून सोडून दिलं.
आणि स्नो झालाच...अगदी नको तेव्हा...मग अजून वैताग...लक्षणं अधिक भीषण कडवी पडण्याचीच होती.
तेवढ्यात कुणीसं म्हटलं, "स्नो पडतोय? सहीच...I am missing snow...मला पावसासारखाच स्नो हा शुभशकुन वाटत आलाय. एकदम आनंदी मूड निर्माण करणारा". अरेच्चा, हा असा कधी विचारच केला नव्हता. म्हणजे शकुनापशकुन अगदीच बकवास विचार होता. ते गेलं खड्डयात..पण पाऊस जसा मूड मस्त करणारा आहे तसा स्नो होऊ शकतो? हं...Interesting...हा जरा वेगळा प्रकार आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यासारखाच स्नो साचलाय, सगळीकडे पांढरा चिखल आहे, आपण मद्दामून तो तुडवत आहोत, पावसात भिजावं तसं स्नोमध्ये खेळत आहोत, स्नो मुळे अतिपावसामुळे मिळावी तशी सुट्टी मिळाली आहे, नि आपण फक्त पाऊस बघावा तसा स्नो बघतोय, एकूणात मोसम सुहाना वगैरे आहे...चित्र तेच होतं पण कोण जाणे ते असं कधीच वाटलं नव्हतं...नि जेव्हा कळलं की हो...स्नो ही मस्त असू शकतो...तेव्हा स्वतःवर यथेच्छ हसून घेतलं...स्नो चा मातम फोल ठरल्यावर स्वतःच्या स्वतःच निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचा शोक त्याहून टुकार वाटू लागला... नि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ही कविता अर्धवटच सोडली...
याआधी अर्धवट राहिलेल्या कुठल्याही गोष्टीचं मला एवढं समाधान वाटलं नव्हतं.
:)))))))))))))))))))))
ReplyDeleteIts all in the way you look at it...isn't snow too pristine and divine to describe? Go, make a snowman or pick up a wonderful book, sit by the porch and sip into some hot chocolate. :)
ReplyDeleteमस्त. मी तीन वर्षे स्नोचा अनुभव घेतला, तो बराचसा असाच होता. ह्या वर्षी समुद्राकाठी आहे त्यामुळे नो स्नो! :)
ReplyDelete@meghana,
ReplyDelete:D
@tapasya,
pristine...yes...but divine...asa kahi asata ka he mala adyap thauk nahi.
porch???...ek garib graduate student aahe mi...mazya apt la balcony pan nahiye...porch???...ni porch madhe thandi nahi ka vajnar?..ek shanka... :)
@raj,
suTlas...:)
Arre...everything in nature is divine, for no species on earth can create it! Ani tu kuthe pan bas re...bed would do too, next to window...bhavnao ko samjho :P
ReplyDeleteare masta lihilayes.. kavita hi changali jamali ahe, ani khali lihilela post hi. :-)
ReplyDeletesnow fall chhan vaTato, paN to lavkar mavaLun jaNara diwas, aNi snow hovun gelyavar ardhavaT viraghaLun sachaNara grey chikhkhal faar udaas karato!
I would agree to Tapasya ... एकच गोष्ट बऱ्याचदा वेगवेगळ्या वेळी वेगळी भासते ...! "मागे तर हेच तुला आवडलेले!?" असे म्हणणाऱ्यांचे मला बऱ्याचदा नवल वाटते. आज असे वाटले ... तर ऊद्या तसे ... दिलपे मत लो यार ... परसो और अलग लगने वाला है...!
ReplyDeleteबर्फावर मात्र रुक्ष किंवा ऊदास वगैरे विशेषणं लावून (आणि तेही ईतके दिवस बीन बदलता) फार अन्याय केलायस ...! त्यांच्याबद्दलच काहीतरी खास लिहून खुश करून टाक आता ...
hi Nimish,
ReplyDeletepahili gosht.. hi 'comment' fakt eka post paryant maryadit nahiye.. (khar tar ha 'snow' vagaire mi kadhi pahilach nahi, comment kaay karnaar kappal?) :)
mast aahe tuza blog.. are khar tar tu lihitos vagaire mala mahitich navte.. ani kavita... kavita pan chhan aahet..
bar zal mala shantanu ne link pathavli te..
good to see you writing.. keep it up.. aata check karen tuza blog.. ani mag lihin 'comments'.. :)
@tapasya,
ReplyDelete"everything in nature is divine, for no species on earth can create it!"
you dont need one super-natural specie to create nature, things can be self-evolving...so I do not think your way. Anyways that is separate issue and not related to this post...so lets end it here.
I agree with you on the point that its all in the way you look at things.
@ Circuit,
Thanks :)
अमेरिकेत खिडकी असणारं आँफिस मिळायला शैक्षणिक अर्हता लागते. आम्ही पडलो विद्यार्थी. त्यामुळे खिडकी असणारं आँफिस मिळण्याची अर्हता आमच्याकडे नाही. त्यामुळे एकदा आपल्या खुराड्यात शिरलं की दिवस, रात्र, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा सगळं सारखंच. बाहेर पाऊस पडतोय हे weather.com पाहिल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे लवकर मावळणार्या दिवसाचं काय दुःख करायचं? नि बर्फ वितळायच म्हणशील तर तेवढा वेळ पारा अजून खाली जाणार नाही यातच आनंद मानून घ्यायचा...मी मुळी सध्या बर्फाला जराही नावं ठेवायला नाकबूल आहे... :)))
@ sangram,
अगदी मान्य.
बर्फावर फार अन्याय झालाय नि फार आडमुठेपणाही... त्याने माझ्यावर केलेले अत्याचार विसरून मोठ्या मनाने मी माफ केलंय :D ... तुझी सूचना लक्षात ठेवतो.. :)
@ meg*,
Thanks :)
मज्जा आहे
ReplyDeleteहिवाळा कधी संपणार?
ReplyDeleteयाआधी अर्धवट राहिलेल्या कुठल्याही गोष्टीचं मला एवढं समाधान वाटलं नव्हतं....
ReplyDelete:)