Friday, September 28, 2007

एका तळ्यात...

दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही

पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही

खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही

रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही

पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही

7 comments:

  1. dusarya olitalya 'sarat'cha arth kalala nahi. te 'sarata' asa ahe ka?
    kavitebaddal kay bolawe? udas-sundar. lihit raha...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. "sara" mhaNaje "taLe"...asa nahiye ka ? (so sarat = taLyat) asa nasata ka? sanskritat "saras" asa shabd aahe aaNi mazyamate "sara" ha shabd anekda kavyat taLe ya arthi vaparatat. tasa sandarbh mala eka online sanksrit - english dictionary madhehi sapadala...paN he sagaLa chook dekhil asu shakata...

    aaNi chook asel tar badalava lagel to shabd...sarat chya aivaji taLyat...don karaNansathi 1) tithe taLe ya arthi shabd havay...2) "sarata" chhan vaTel paN vruttat basNar nahi...

    ReplyDelete
  4. तळे या अर्थानं हा शब्द वापरतात हे मला माहीतच नव्हतं. त्यामुळे ’असेल बुवा’ एवढीच माझी प्रतिक्रिया!

    आणि तू वृत्ताचाही विचार करतोस, करू शकतोस इतक्या अर्थश्रीमंत कविता लिहिताना? मला तुझ्याविषयी गाढ आदर वाटायला लागलाय आता... आणि उत्सुकताही. की वृत्त वा छंद यांच्या पलीकडे जाऊन लिहिलंस, तर काय लिहिशील? कधीतरी एखादी मुक्तछंदातलीही ऐकव जमलं तर... मला बसून फर्माइशी करायला काय जातंय म्हणा! :)

    ReplyDelete
  5. hhahaha.....aadar vagaire...lol

    muktachandatahi lihilay ki...ithe pavsachi gaj nahi, leNa muktachhandatach aahet...aaNi hee kavita nusati vruttat nahiye....gazaleche sagaLe niyam paLun lihilya....[ugach atmaprauDhi hotya jara..:P]...

    ReplyDelete
  6. हो, ते नंतर आलं माझ्या लक्षात. ’इथे पावसाची गाज नाही..’ आठवल्यावर.
    पण असे नियम पाळून लिहिताना त्या नियमांचा जाच झाल्यासारखं नाही का रे वाटत? असंच कुतूहल...

    ReplyDelete
  7. नाही वाटत. असं नियमबद्ध नाही सुचलं तर सोडून द्यावं. सुचेल ते लिहावं. सुचलं तर प्रयत्न करावा. मुक्तछंदात लिहून वृत्तांना नावं ठेवायची किंवा वृत्तबद्ध लिहून मुक्तछंदाला नावं ठेवायची या पेक्षा दोन्ही माध्यमांचा आनंद घ्यावा. दोन्हीत मजा आहे. शिवाय आपलं वृत्त आपणच तर ठरवतो ना? नियमांचा जाचच झाला पाहीजे हे गणित माझ्या समजण्यापलीकडचं आहे. किंबहुना नियमांत लिहिणं अधिक आव्हानात्मक आहे. आणि मुख्य म्हणजे मला आवडतं. विचार महत्त्वाचा. माध्यम दुय्यम आहे.

    ReplyDelete