Wednesday, March 10, 2010

थोड़ी सी रात और है…

सकाळी सकाळी स्नूझ स्नूझ करत तडफडतानासुद्धा


तुझं डोकं

 


“जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो…”

असं ग़ुलज़ारू होत असेल ना?

मग पुन्हा गजर खणखणण्यापूर्वीची पाच मिनिटं


तू कशी काढतोस?


रात्रभर चाललेला


कानठळ्या बसविणारा


प्रतिमांचा अनियंत्रित जागर

 


शमला ह्या सुखात,


की त्या कोलाहलातून
नाहक उरून
घर करून बसलेलं


काकूछाप अनाम बाईचं

 

हो, हो, मला सोळा भाषा येतात,”

 


असलं संदर्भहीन वाक्य

 


आता भंडावून सोडत


आपल्याला स्वत:समोर खुजं करत


आंतर्बाह्य पोखरून काढणार ह्या भीतीत,

 


की बेलगाम धावणाऱ्या मेंदूला


स्वप्नांचं गोंडस रूप देऊन


भास भास म्हणत

त्याची जबाबदारी तुला आता जागेपणी झटकता येणार नाही


ह्या दडपणात,

 


की आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ग्रहण करत सुटलेल़्या


पंचेंद्रियांचं अनाठायी ओझं


मेंदूला आता पेलणार नाही, ह्या चिंतेत?



तुझ्या चेहऱ्यावरचा सकाळीचा थकवा


अशांत रात्रीचा,

 


की

आ वासून ठाकलेल्या
अनिवार्य दिवसाचा,

 


की प्रतिभेची
वाट बघत
वास्तवाचे
रंग, पोत,
गंध, नाद


रवंथ करत


निव्वळ साचणाऱ्या


संचिताच्या कोवळ्या ऋतूंचा?

कळ्या घ्या, फुलं

द्या


असल्या ह्या प्रतिभेसाठी
एवढं असं झुरत राहणं
खरंच का आहे वर्थ?


सामावून घेत राहण्याला


खरंच का आहे अर्थ?



विक्षिप्तसे वाटेलही


तरीही ऐकून घे
डोक्याचे हे फिर फिर फिरणे
प्रतिक्षिप्तसे झाले आहे.

 


थोडा वेळ तरी तुझे

 


प्रश्न जरा आवरून घे


किती काळ

डोळे असे

ठेवायचे मी सताड उघडे?
दिवसरात्र जाऊ देत


पहाटे तरी निदान मला


पाच मिनिटं झोपू दे.

8 comments:

  1. खतरनाक! काय सुरेख फ्लो आहे रे! कसल्याही यमनियमाशिवायची कविता आणि ती अशी झोकात वाहत चाललेली.
    ’कळ्या घ्या, फुलं द्या...’
    वाह.
    मला का दिसली नाही रीडरमधे काय माहीत.

    ReplyDelete
  2. की बेलगाम धावणाऱ्या मेंदूला
    स्वप्नांचं गोंडस रूप देऊन
    भास भास म्हणत
    त्याची जबाबदारी तुला आता जागेपणी झटकता येणार नाही
    ह्या दडपणात,
    की आजूबाजूची प्रत्येक गोष्ट ग्रहण करत सुटलेल़्या
    पंचेंद्रियांचं अनाठायी ओझं
    मेंदूला आता पेलणार नाही, ह्या चिंतेत?

    sahi. 'guljaru' :)

    ReplyDelete
  3. @ Meghana, Kshipra,

    Thanks! :-)

    KaLya Phule gheNe deNe ... saabhar Aarati Prabhu.

    ReplyDelete
  4. wow, कविता आवडली खूप!
    ग़ुलज़ारू शब्द भन्नाट आहे रे!

    "एवढं असं झुरत राहणं
    खरंच का आहे वर्थ?" मधला वर्थ मराठी शब्द असल्याप्रमाणे अगदी फिट्ट बसलाय तिथे!

    कसं रे.. कसं काय जमतं तुम्हाला हे?

    ReplyDelete
  5. सॉलीड जमून आली आहे रे कविता. खुप आवडली.

    -- Samved

    ReplyDelete
  6. @ जास्वंदी, संवेद,

    थॅंक्यू!! :)

    ReplyDelete
  7. khup warshani blogaanwar firtey!!!

    u r amesing!!!!

    ReplyDelete
  8. @ स्नेहल,

    थँक्यू! :)

    ReplyDelete