Wednesday, December 23, 2009

बहर

नुकताच इथे वळवाचा पाऊस पडून गेला
पाहून बहर परवाचा पाऊस पडून गेला

झाडांच्या हिरव्या फांद्या
शेवाळ मखमली शाली
झाडांची पाने हिरवी
पानांवर निथळे पाणी
देठांशी ओल्या, उरल्या
झाडे ती हिरवी झाली

सर ती सरता सरता
झरली, फुले बरसली
झाडे हरता हरता
माती अशी बहरली

पाऊस येतो आणि माती अत्तर अत्तर
पाऊस जातो आणि माती पत्थर पत्थर

झाडांचे बहर मनस्वी
पाऊस येतो. जातो.

8 comments:

  1. पाऊस येतो आणि माती अत्तर अत्तर
    पाऊस जातो आणि माती पत्थर पत्थर

    great! khoop surekh!!!!!!!

    ReplyDelete
  2. Last two lines are VERY powerful. Brilliant. Hadn't read such good poetry in a while...

    ReplyDelete
  3. सगळ्या आधी तू रायटर ब्लॉक मोडल्यानिमित्त अभिनंदन!
    मला कविता आवडली आणि नाही पण.
    शब्दांची छान गंमत आहे, त्यामुळे एक अतंर्गत लय मिळालीए कवितेला. झाडे, रंग, पाऊस म्हणजे आपला एकदम वीक-पॉईन्ट!
    तू तुझ्या नेहमीच्या कवितेतून बाहेर आलास हे वेगळं आहेच पण तू अजूनही मुक्तात थोडासा काचकुचतो आहेस हे वाईट. पुढच्या वेळी अजून मोकळा होऊन बेधडक लिहीशल तर याहून जास्त मजा येईल

    ReplyDelete
  4. मजा आली बॉस ...! ईथेही काल आणि परवा पाऊस झाला!

    ReplyDelete
  5. "पाऊस येतो आणि माती अत्तर अत्तर
    पाऊस जातो आणि माती पत्थर पत्थर"


    कड्डक!
    सुंदर कविता...

    ReplyDelete
  6. झाडांचे बहर मनस्वी
    पाऊस येतो. जातो.

    sahi.

    ReplyDelete
  7. हरेकृष्णजी, क्रांती, तपस्या, आल्हाद, संग्राम, क्षिप्रा,

    आभार!

    संवेद, पॉइण्ट नोटेड. आभार :)

    ReplyDelete