Wednesday, July 22, 2009

हंस अकेला

रस्त्यावर वळणे येती? वळणाशी रस्ता येतो?
एकटे एकटेपण ये, की मीच एकटा येतो?

पाऊस उन्हाचा वैरी, छायेचा आश्रित मीही
दारावर म्हणून माझ्या पाऊस सारखा येतो?

ही भिंत हवी की खिडकी - आतून पाहण्यासाठी?
भिंतीत चिरावी खिडकी; खिडकीतुन वारा येतो!

आरशात दुकटा दिसतो, डोळ्यांत एकटा असतो
प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये हा कुठून ऐना येतो?

प्रश्नाला उत्तर मिळता ती जोडी दो हंसांची
एकटाच उडून जाण्या हा हंस एकला येतो

10 comments:

  1. आरशात दुकटा दिसतो, डोळ्यांत एकटा असतो
    प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये हा कुठून ऐना येतो?

    hyaa oli aavadalya.

    ReplyDelete
  2. Ultimate!!!

    You are really too good dear!!!

    I don't understand how can u think so maturely?

    ReplyDelete
  3. Khupach chaan...very deep and mature thoughts...esp the couplet "Aarshyat duktaa disto, dolyat ektaa asto.."

    Too good.

    ReplyDelete
  4. >>पाऊस उन्हाचा वैरी, छायेचा आश्रित मीही
    दारावर म्हणून माझ्या पाऊस सारखा येतो?

    Wah!!! kya baat hai...

    ReplyDelete
  5. sahee re.

    hi kavitaa "geyyy" suddha zali asavi ashi khaatri vaTatey. sadhi sopi chaal suddha laavata yeil itake 'meter' madhe basalet shabd.

    btw, tuza ha blog tuzya profile var listed nahi. 'asanemanthinks' he mazya lakshat aahe, pan bakichyancha kay?

    ReplyDelete
  6. क्षिप्रा, स्नेहल, आनंद, तपस्या, सर्किटः
    धन्यवाद!

    सर्किटः
    अरे, मीटरमध्ये असायलाच हवी. शिस्तीत मात्रावृत्तात लिहिल्या. गझल लिहायची म्हणजे वृत्त आलंच! नसती तरच झोल! आता गेय वगैरे...तू चाल लावून गा नि ऐकव....मला त्यात गती नाही :|

    नि ते प्रोफाईलचं जरा ड्युअल आयडेंटिटी क्रायसिस झालाय. म्हणजे हा ब्लॉग वेगळ्या जीमेल अकाऊंटशी जोडलेला आहे नि मी कधी कधी प्रतिक्रिया देताना दुसरा अकाऊंट वापरून देतो. त्यामुळे तो तिथे दिसत नाही. ते आधी एकच होतं. मध्ये वेगवेगळं केलं. पण आता ते परत निस्तरायला हवंय! आळस! सगळ्यांनी गूगल रीडर वापरावा अशी माझी सुप्त इच्छा आहे, म्हणजे त्यांना हा प्रॉब्लेम येणारच नाही!

    ReplyDelete
  7. सध्या हंसांना बरे दिवस आलेले दिसतात! निरजानेही हंसच पाळला आहे. श्रावण आहे रे बाबा, सांभाळुन.

    आरशात दुकटा दिसतो, डोळ्यांत एकटा असतो
    प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये हा कुठून ऐना येतो?

    हे एकदम झ्याक! मला हा प्रकार भयंकर आवडला

    ReplyDelete
  8. खुपच सुंदर आहे गजल...

    आरशात दुकटा दिसतो, डोळ्यांत एकटा असतो
    प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये हा कुठून ऐना येतो?

    मस्तच !!!

    ReplyDelete