एक निराशा द्या रे कोणी
निखळ निराशा माझ्यासाठी
कोरा तुम्ही तुमची लेणी
एक गुहा द्या माझ्यासाठी
काय तुम्हांला देऊ सांगा
छिन्नी घ्या ही तुमच्यासाठी
कोरा तुम्ही तुमची शिल्पे
घाव घणाचा माझ्यासाठी
घडवा पुतळे, कोरा गाथा
नक्षीबिक्षी तुम्हां हवी ती
कभिन्न कातळ एक मला द्या
घोर शांतता माझ्यासाठी
प्रवीण पाथरवटही तुमचा
हसर्या मूर्ती बहुअंगांनी
भूलस्मिते ती तुम्हीच उधळा
अनाम मुखडा माझ्यासाठी
त्यात असू द्या फक्त निराशा
सर्वार्थाने माझ्यासाठी
मिट्ट तमाचा गच्च घनांचा
घट्ट मेखला माझ्यासाठी
आशेच्या त्या नको किनारी
जरीकोंदणे तुमच्यासाठी
भिन्न नको ते पैलू मजला
निस्तेज हिरा माझ्यासाठी
शुभ्र निराशा तुम्हीच घ्या ती
सुतकी तसली देखाव्याची
नेसुन यावी कोणी शेला
संक्रांतीचा माझ्यासाठी
नैराश्यालासुद्धा तुमच्या
कितीक नखरे, ग्लॅमर भारी
मिरवा तुम्ही, नको मला तो
अंश त्यातला माझ्यासाठी
कातळ माझा डोंगर तुमचा
बधिर शांतता, गुहाच माझी
शिरात घुमतो घाव घणाचा,
अरूप पुतळा माझ्यासाठी
एवढेच द्या, बाकी तुमचे
कराल का हो एक आणखी?
करुन निराशा माझ्या नावे
हक्कहि सोडा माझ्यासाठी
khatarnak bhau! lage raho!
ReplyDeletemy god!!!
ReplyDeleteit gives goose bumps while reading!!
त्यात असू द्या फक्त निराशा
सर्वार्थाने माझ्यासाठी
मिट्ट तमाचा गच्च घनांचा
घट्ट मेखला माझ्यासाठी
ultimate....
शुभ्र निराशा तुम्हीच घ्या ती
सुतकी तसली देखाव्याची
नेसुन यावी कोणी शेला
संक्रांतीचा माझ्यासाठी
No words....
etaki achuk mandani??
tihi nairashyachee!!
gr8!!
एवढेच द्या, बाकी तुमचे
ReplyDeleteकराल का हो एक आणखी?
करुन निराशा माझ्या नावे
हक्कहि सोडा माझ्यासाठी
climax!!!
नादखुळा भावा! बरेच काही आवडले. ईथे परत लिहायचे म्हणले तर सगळा पोस्टच परत लिहावा लागेल. मस्त लिहिलायस. मजा आली.
ReplyDeleteGood one..was (finally) able to understand
ReplyDeleteQuick comment - isn't 'mekhala' a plural??
- SG
एवढेच द्या, बाकी तुमचे
ReplyDeleteकराल का हो एक आणखी?
करुन निराशा माझ्या नावे
हक्कहि सोडा माझ्यासाठी
surekh ! nairyashyachee aarjave
Sunder re bhau...
ReplyDeletepan ka?
@ मेघना, स्नेहल, संग्राम, शंतनु, क्षिप्रा, संवेद,
ReplyDeleteधन्यवाद!
@ शंतनु,
हं...मेखला हा शब्द स्त्रीलिंगी आहे असं वाटतंय मला आता. "वाहती आकाशगंगा की कटिची मेखला". नि तो तसा वापरल्यास ते दोन्ही एकवचनी व अनेकवचनी रूप होईल. पण का कुणास ठाऊक मी रोजच्या बोलीत ह्या शब्दाचा अनेकदा पुल्लिंगी वापर ऐकला आहे. जर तो अगदीच चूक आहे असं कळलं तर बदल करेन. धन्यवाद!
@ संवेद,
पण का? आता काय सांगायचं. एकदा झडझडून पडून मोकळा हो बाबा, असं साचलेल्या पावसाला कधी कधी उद्विग्नपणे म्हणावं लागतं ना, तशा कुठल्याशा साचलेल्या क्षणी!