हलते न पान रानी, ऐसाच येथ वारा
भिजतो न चिंब रात्री, ऐसा इथे किनारा
जुळवून पाहतो मी नक्षत्र एक रात्री
असतो कमीच नेमे एखाद रोज तारा
जुळले कसे कधी ते, वृंदात साज सारे
पुरतो मलाच हल्ली माझाच एकतारा
सुचते नवे न हल्ली बोलावयास काही
हुडकीत कोश बसतो एकेक शब्द न्यारा
दिसते बरेच काही, जे पाहिजे बदलले
बसतो मनात मग मी घालीत येरझारा
चळती क्षणाक्षणांच्या मी चोख मांडलेल्या,
पण आवरू कसा मी मेंदूतला पसारा?
निमिषास वेग नाही, वेगास ठाव नाही,
भ्रमत्या सुसाट चित्ता लाभे कसा निवारा!
sundar re sundar! jeevghene lihile aahes!
ReplyDelete>>> भ्रमत्या सुसाट चित्ता लाभे कसा निवारा!
ReplyDeleteKhupach surekh.
जुळवून पाहतो मी नक्षत्र एक रात्री
ReplyDeleteअसतो कमीच नेमे एखाद रोज तारा
-वा! क्या बात है! मस्त जमुन आली आहे गझल!
थोडीशी नुक्ताचिनी करते, पहिले पाच शेर, कृतीवाचक शब्दांनी सुरु होतात आणि एक घाट तयार करतात, (form), त्या ओघात मग 'चळती' ही क्रिया वाटते - चळणे या पदावरुन. त्यामुळे थोडा गोंधळ उडतो.
ReplyDeleteअर्थात, गजलच्या नियमांनुसार,शेरांचा (शी दुस-या भाषेतील शब्दांचे सामान्यरुप फार्च बेंगरुळ होते!) एकमेकांशी संबंध वर्जच तरीही एक घाट म्हणुन सुचना!
गजल मस्त जमलीय म्हणुन छोटेसे गालबोट.
सुंदर गझल. आवडली.
ReplyDeletepratyek sher vegala mhanun chaan vatala..pan link kalali nahi. ka navhatich? majhyasarakhya kavyarasagrahanatalya shUnya bhopalyacha ha prashna halakech ghya.
ReplyDeleteदिसते बरेच काही, जे पाहिजे बदलले
ReplyDeleteबसतो मनात मग मी घालीत येरझारा
mastach
awesome ...! ek ni ek oL sahi ahe ...
ReplyDeleteसुंदरच झाली आहे मित्रा...नेटावर भेटा..एक observation सांगतो...
ReplyDelete@ यशोधरा, आनंद, राज, स्नेहा, संवेद, मंजिरी, कोहम, संग्राम,
ReplyDeleteअनेकानेक आभार!
@ कोहम,
सगळ्या शेरांना जोडणारी साखळी आहे पण, नि नाही पण. आहे असं वाटलं तरी ठीक, नाही असं वाटलं तरीही ठीकच! भरकटलेल्या मनातलं सगळं एका पक्क्या ठळक साखळीने कसं बांधता येईल?
नि बाय द वे, एवढं फॉर्मल कशासाठी? सर्व प्रतिक्रियांचे स्वागतच आहे!
@मंजिरी,
नुक्ताचिनीसाठी पुन्हा एकदा आभार. आपलं निरीक्षण योग्य आहे, लक्षात ठेवीन.
This comment has been removed by the author.
ReplyDeletehe kakawyache neeyam beeyam malaa mahit nahit pan tula je kahi mhnaychay te aat paryant pochta!!! hats off!!
ReplyDeleteAmazing....very well written :)
ReplyDeleteLoved the one "diste barech kahi....ghaalit yerzara"