Sunday, August 26, 2007

लेणे

एक लेणे खोदीन म्हणतो
कोरीवकाम करीन म्हणतो
अतिसूक्ष्म
दगडाच्या कणालाही छेदणारं
विश्वाचं गूढ उकलणारं
काळ्या कातळात थंड गुहेत एकांतात बसेन म्हणतो
जगापासून अलिप्त दूर विश्वाचं रहस्य उलगडीन म्हणतो
तीक्ष्ण आयुधं तयार आहेत
सूक्ष्माचा वेध घ्यायला नजर माझी तीक्ष्ण आहे
काळा कातळ शोधत आहे
इतरत्र तो दिसत नाही
मनालाच कणखर बनणं प्राप्त आहे.

3 comments:

  1. "मनालाच कणखर बनणं प्राप्त आहे."

    अपरिहार्य आणि अंतर्मुख. अफाट सुरेख.

    ReplyDelete
  2. मस्त....डोळ्य़ापुढे उभी राहिली सगळी......
    आहे तुझी पण माझीहि वाटली...

    ReplyDelete