निकड शांततेची आता कुणास आहे?
गजबजीत ऐका एकांत वाजताहे
अथक रोखणे हे तूफान व्यर्थ आहे
गलितपर्णराशी धारांत वाजताहे
गरज गर्जण्याची वार्यास काय आहे?
खवळली कधीची लाटांत गाज आहे
अनल भास्कराच्या गाभ्यात व्यर्थ आहे
तरुण रात्र आभा तार्यांत मोजताहे
गरज शीर्षकाची काव्यास काय आहे?
सहज अर्थवाही शब्दांत साज आहे
Hats off!
ReplyDeleteThanks a lot...:)
ReplyDelete>>गरज शीर्षकाची काव्यास काय आहे?
ReplyDeleteसहज अर्थवाही शब्दांत साज आहे<<
Too good!
निकड शांततेची आता कुणास आहे?
ReplyDeleteगजबजीत ऐका एकांत वाजताहे
apratim!!!