माणसाचे माणसाशी काय आहे वाकडे
कोण आहे येथ ज्याचे रक्त नाही तांबडे
भूक पोटी, फोन हाती, झुंड आहे सोबती
रुंद झाले काळजांनी पोसलेले मग तडे
हे नव्हे निर्नायकी, ही झुंड नाही एकटी
स्पंदती हृदये अशी ज्यांना न याचे वावडे
पसरती म्हणतात खोट्या बातम्या वाऱ्यापरी
तंत्र लाभो एक जे जोडेल अपुले आतडे
झुंड झुंडीलाच पोसे, बेडकीसम म्होरके
वाढले कित्ती जरी छाताड त्यांचे तोकडेे
कायद्याचे राज्य आहे, कायदा म्हणतो असे
वायदा हा पाळ रे, इतकेच आहे साकडे
No comments:
Post a Comment