संवेदच्या खोखोमध्ये पब्लिक ज्या तडफेनं आणि वेगानं उतरतंय ते पाहून हे लोक पेटण्यासाठी ठिणगीची वाट पाहत का बसले होते, काही कळेना.
***
मी भाषांतर करणार नाही आता, केलं तरी छापणार नाही ब्लॉगावर, येत नाही मला ते करता ह्या मताचा मनात नि जनात उच्चार केला नि संवेदने हा दुष्ट खो चालू केला. वर आम्हांला आग्रहाचं आवताण. आता भोगा.
***
एकंदरीत ब्लॉगविश्वात युरोपिअन भाषांना (युरोपाचा एकंदरीत भाव सध्या उतरला असला तरी) भलताच भाव दिसतोय. आपली सरड्याची धाव इंग्लिश, हिंदी नि गेलाबाजार उर्दूपर्यंतच. ह्या भाषा येणार्यांना ह्यातल्या कवितांच्या भाषांतराचं काहीसुद्धा कवतिक नसतं. शप्पत्थ! (घर की मुर्गी ... असो.) संस्कृताचं उठून भाषांतर करावं असा काही संस्कृताचा आपला अभ्यास राहिला नाही, ह्याचं एक राहून राहून वाईट वाटलं. त्यामुळे आमची ही आमचं सख्य असणार्या सख्ख्या मावश्यांची भाषांतरं.
***
बॉब डिलनविषयी मज पामराने काय बोलावे. येथे पाहा. त्याचं हे नितांतसुंदर गाणं.
Blowin' In The Wind
How many roads must a man walk down
Before you call him a man?
Yes, ’n’ how many seas must a white dove sail
Before she sleeps in the sand?
Yes, ’n’ how many times must the cannonballs fly
Before they’re forever banned?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
How many years can a mountain exist
Before it’s washed to the sea?
Yes, ’n’ how many years can some people exist
Before they’re allowed to be free?
Yes, ’n’ how many times can a man turn his head
Pretending he just doesn’t see?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
How many times must a man look up
Before he can see the sky?
Yes, ’n’ how many ears must one man have
Before he can hear people cry?
Yes, ’n’ how many deaths will it take till he knows
That too many people have died?
The answer, my friend, is blowin’ in the wind
The answer is blowin’ in the wind
(चालीतला अनुवाद)
वाटा किती सांग झाल्या पायाखालच्या
की म’ माणसास माणूस म्हणवणार?
नि हो, पाखरू किती सागर मागे टाकले
की म’ काठावर पंख पसरणार?
नि हो, नेमक्या कितीदा ह्या तोफा धडाडल्या
की म’ कायमची बंदी घालणार?
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
किती काळ सांग हा पर्वत ठाकणार
नि म’ सागरात वाहून जाणार?
नि हो, किती काळ सांग कुणी लोक कंठणार
मुक्तीवाचून कसे थोपणार?
नि हां, कितीदा कुणी सांग नजरा फेरणार
नि दिसत नसल्याचं सोंग वठवणार?
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
मान कितीदा वर लागते करावी
कुणा आभाळ दिसावं म्हणून?
नि हो, कान पाहिजेत किती एका व्यक्तीला
कानी आक्रोश शिरावा म्हणून?
नि हो, कित्ती लोक अजून मेले की म’ कळेल
गेले हकनाक बरेच ब्वा, म्हणून
उत्तर, अरे यार, ना दडलंय कुठे आत
उत्तर तर उडे वारियात
***
The American Poetry & Literacy Project हा प्रकल्प अमेरिकेत कविता जनमानसांपर्यंत नेऊन पॉप्युलर करण्यासाठी राबवला गेला/जात आहे/असावा असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या 101 Great American Poems पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. त्या वरवर चाळल्या नि रॉबर्ट फ्रॉस्टची रम्य रानं नि पायाखाली नसलेले रस्ते सोडून पुढे गेलो तर थेट फक्त १०१वी कविता (अर्थात मधल्या काही गाळून-चाळून तिथे पोहोचल्यावर) वाचता क्षणी आवडली. ती ही W. H. Auden ची कविता (त्याच्याबद्दल इथे वाचा). तर हा मूळचा इंग्लिशमन निघाला! (घ्या...एका दगडात). वास्तविक ती कविता वाचूनच कळतं, ‘हे अमेरिकनाचे काम नोहे’. (जालीय प्रताधिकारमुक्त (बहुदा) स्रोत: http://www.poets.org/viewmedia.php/prmMID/15549)
The Unknown Citizen
(To JS/07/M/378 This Marble Monument Is Erected by the State)
He was found by the Bureau of Statistics to be
One against whom there was no official complaint,
And all the reports on his conduct agree
That, in the modern sense of an old-fashioned word, he was a saint,
For in everything he did he served the Greater Community.
Except for the War till the day he retired
He worked in a factory and never got fired,
But satisfied his employers, Fudge Motors Inc.
Yet he wasn't a scab or odd in his views,
For his Union reports that he paid his dues,
(Our report on his Union shows it was sound)
And our Social Psychology workers found
That he was popular with his mates and liked a drink.
The Press are convinced that he bought a paper every day
And that his reactions to advertisements were normal in every way.
Policies taken out in his name prove that he was fully insured,
And his Health-card shows he was once in hospital but left it cured.
Both Producers Research and High-Grade Living declare
He was fully sensible to the advantages of the Instalment Plan
And had everything necessary to the Modern Man,
A phonograph, a radio, a car and a frigidaire.
Our researchers into Public Opinion are content
That he held the proper opinions for the time of year;
When there was peace, he was for peace: when there was war, he went.
He was married and added five children to the population,
Which our Eugenist says was the right number for a parent of his generation.
And our teachers report that he never interfered with their education.
Was he free? Was he happy? The question is absurd:
Had anything been wrong, we should certainly have heard.
(अनुवाद)
अनाम नागरिक
(अ.त./०७/पु/३७८ ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक शासनाच्या निधीतून उभारण्यात आले.)
राज्य सांख्यिकी आयोगाकडे उपलब्ध माहितीनुसार
ह्यांच्याविरुद्ध कोणत्याही अधिकृत तक्रारीची नोंद नव्हती,
व ह्यांच्या वर्तनासंबंधित सर्व अहवाल निर्विवाद सांगतात
की आधुनिक संदर्भांनुसार त्यांची वर्तणूक ‘संत’ व्यक्तीप्रमाणेच होती,
कारण त्यांनी आपल्या हरेक कामात नेहमीच व्यापक समाजाचे हित पाहिले.
मधला युद्धाचा काळ वगळला, तर ह्यांनी निवृत्त होईपर्यंत
एकाच कारखान्यात विनाखंड काम केले नि कामावरून कमी करणं तर दूर
उलट ‘फज मोटर्स’ ह्या त्यांच्या उद्योगसमूहाचे मालक त्यांच्या कामाबद्दल नेहमी समाधानी राहिले.
पण म्हणून काही हे मालकांचे पंटर नव्हते,
कारण त्यांनी युनिअनच्या सभासदत्वाची वर्गणीही नियमितपणे भरली,
(ह्यांच्या युनिअनसंबंधी प्राप्त अहवालात कोणत्याही गैरप्रकाराची नोंद नाही.)
आणि आमच्या समाजसेवकांनी मिळवलेल्या माहितीनुसार
हे आपल्या गोतवळ्यात सर्वांचेच आवडते होते व एखाद ड्रिंक आवडीने घेत.
वृत्तपत्रांचे प्रतिनिधी खातरीलायकपणे सांगतात की ते दररोज वर्तमानपत्र विकत घेत
आणि जाहिरातींवरील त्यांच्या प्रतिक्रिया चारचौघांसारख्याच सामान्य असत.
ह्यांच्या नावे काढण्यात आलेल्या विमा पॉलिसींवरून हे स्पष्ट आहे की त्यांचा हरप्रकारे विमा उतरवण्यात आला होता
आणि ह्यांच्या आरोग्याचा दाखला दर्शवतो की त्यांना एकदा दवाखान्यात दाखल करण्यात आले होते,
जिथून ते सुखरूप बरे होऊन परतले.
‘प्रोड्युसर्स रीसर्च’ व ‘हाय-ग्रेड लिविंग’ ह्या दोहोंच्या मते
ते आपल्या मासिक हफ्ता योजनेचे फायदे जाणून होते
आणि आधुनिक मानवाला आवश्यक त्या सर्व सुखसोयी, जसे की -
ग्रामोफोन, रेडिओ, मोटारगाडी, फ्रीज इ. बाळगून होते.
आमचे जनमताचे विश्लेषक समाधानकारक अहवाल देताना सांगतात,
की ते वेळोवेळी त्या त्या वेळी योग्य अशी मतं राखून होते -
जेव्हा शांतता नांदत होती, तेव्हा ते शांततेचे पुरस्कर्ते होते;
नि जेव्हा युद्धाची वेळ आली, तेव्हा ते युद्धाच्या आघाडीवरही गेले.
हे विवाहित होते व ह्यांनी लोकसंख्येत पाच अपत्यांची भर टाकली,
आमच्या सुमानववंशतज्ज्ञांच्या मते त्यांच्या पीढीसाठी पाच ही अपत्यसंख्या योग्यच होती,
आणि आमच्या शिक्षकांच्या मते ह्यांनी कधीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणात ढवळाढवळ केली नाही.
ते स्वतंत्रमुक्त, स्वच्छंदीआनंदी होते का?
हा काय अचरट प्रश्न आहे, हे काय विचारणं झालं?
जर तसंच काही असतं
तर आम्हांला नक्कीच कळलं असतं.
***
अजून भोगा. जावेद अख्तर हा आपला उगाच गुलज़ारी जरीची आसमानं आणून चमकदार शब्द न पेरणारा वास्तवाचा कवी. केवळ आपली रुची अभिजात का काय ती आहे हे ठसविण्यासाठी गुलज़ारचं प्रेम असेल तर तुम्हांस ते लखलाभ असो; मला जावेद अख्तरही तेवढाच आवडतो. (एक आकाशात विहरणारा surreal कवी नि एक जमिनीवरून चालणारा real कवी असा एक मोघम फरक वाटतो मला --- दोन्हीही चांगल्या अर्थानेच. वाद नकोत. वादंग तर मुळीच नकोत.) त्याच्या सोप्या गाण्याच्या सोप्या अनुवादाचा प्रयत्न.
तुमको देखा तो ये ख़याल आया
ज़िंदगी धूप तुम घना साया
आज फिर दिल ने एक तमन्ना की
आज फिर दिल को हमने समझाया
तुम चले जाओगे तो सोचेंगे
हमने क्या खोया हमने क्या पाया
हम जिसे गुनगुना नहीं सकते
वक़्त ने ऐसा गीत क्यूं गाया
(अनुवाद)
तुला पाहून काही आत उमललं
अन रोजच्या लाहीत खुप गार वाटलं
आज मन पुन्हा वाहावत गेलं
त्याला मग समजावून परत आणलं
तू गेल्यावर मग करीन ताळा
काय जमवलं नि काय गमावलं
मला गुणगुणताही न यावं असं
काळानं गाणं का बरं गायलं
खरं तर तारकशमधल्या काही कवितांची मागे केली होती भाषांतरं. पुन्हा केव्हातरी. आता पुरे!
माझा खो ‘नंदन’ला.
Mala tumcha "European" bhashancha mat patla. :)
ReplyDeletePan me pan tech kelay. :D
Bob Dylan chya ya itkya sahi ganyacha anuvad karna kasa kay buva suchla? Asa pahila ki "mala ka nahi he suchla?" asa ek atishay astringent prashna manala sukvun jato. :(
>>आज मन पुन्हा वाहावत गेलं
त्याला मग समजावून परत आणलं
he wakya mala mooL olinpeksha awadla. Agdi sadha pan khup bolka. :)
Unknown citizen pan far chan jamun alay. Tyala Marathi kachericha to ghasa sukeparent badbadnara effect alay. Far chan watla vachun.
Dhanyavad!!
PS: Mala kavitecha shastra kaLat nahi. Tumchya Gayatrichya blogwarchya comments wachun mala :O asa zala hota. :D
Cheers
Saee
1) you must have heard the famous angry song- we didn't start the fire, it was always burning...खो खोचं कदाचित तसं झालय
ReplyDelete२) ज्या काही संस्कृतींना अभिजात म्हणता येईल, त्यात युरोपिअन संस्कृतीचा नंबर बऱ्यापैकी वर असावा म्हणूनही एक आकर्षण
३)काही तरी विनोदी पण करत जाऊ नकोस. भाषांतर करणार नाही काय? मग आम्ही कसं वाचणार?
४)एका ऎवजी ३ कविता "हाणल्यास" हे लय भारी!!!!
५)त्या ३ कविता वेगवेगळ्या बाजाच्या हे म्हणजे एकदम हणमंत काम!
६)पहीली मुळ कविता आवडली, दुसरीचं रुपांतर जास्त आवडलं. तिसरी बद्दल मत व्यक्त करणं कठीण आहे कारण अतीपरिचयात अवज्ञा
७) हा मुदा उगाच. ७ आकडा आवडतो म्हणून टाकलेला. छान :)
@ सई,
ReplyDelete"Bob Dylan chya ya itkya sahi ganyacha anuvad karna kasa kay buva suchla?"
काये की "great people do not do anything different, they just do the same differently)" असं कुणाचं संतवचन आहे! :P :D (मजा करतोय. खरं कारण हे आहे की चौथी पास माणसाला अजूनही चौथीतली कविता लख्ख आठवत असते, जी पी एच डी माणसाला नाय आठवत. तसंच काहीसं :) )
तुझ्या बाकी प्रतिक्रियेसाठी आभार! :)
नि त्या गायत्रीच्या ब्लॉगवरील प्रतिक्रियांमधून भलताच गैरसमज झालेला दिसतोय. माझं कवितेच्या व्याकरणाच, ज्ञान कैच्या कै मर्यादित आहे! :(
@ संवेद,
ReplyDeleteमुद्देसूद उत्तर द्यायला पाहिजे.
१,२) हां!
३) :-।
४,५) खोखोपायी चार लोक येऊन वाचतील, तर म्हटलं मारून घ्यावा हात.
६.१) अर्थात. ६.२) धन्यवाद. ६.३) समजण्यासारखं आहे.
७) हो हो. सात समुद्र, सात स्वर्ग, सात दिवस, ३६० ला ७ ने भाग न जाणे, सात रंग इं.धनुचे वगैरे. :-)
झकास! तिन्ही कवितांची निवड आणि अनुवाद उत्तमच. या जनगणनेच्या वर्षात तर दुसरी कविता समयोचित म्हणावी लागेल ;).
ReplyDelete'खो' घेतोच दोन-तीन दिवसांत.
@ नंदन,
ReplyDeleteहाहा! nice observation!
वाट पाहतोय!
अरे ऑडेनची कविता आणि तुझं भाषांतर खूप आवडलं. डिलनचा अनुवाद खरंच मस्त बसतोय चालीत :) - या गाण्यावरूनवरून आजच वाचलेलं एक वाक्य आठवलं : Nothing which does not transport is poetry. The lyre is a winged instrument. -Joseph Joubert, essayist (1754-1824) डिलनच्या गाण्यांचा असा ’ये हृदयीचे ते हृदयी’ प्रवास किती सहज होतो! आणि ’तुमको देखा’ बद्दल संवेदशी सहमत.
ReplyDelete@ गायत्री,
ReplyDeleteधन्यवाद. तू म्हणून पाहिलंस ना गाणं डिलनचं...मस्त वाटलं तुलाही ती लय सापडली हे वाचून. आणि हो, डिलनच्या गाण्याबद्दलचं मतही पटलं.
***
गायत्रीला डिलनचं गाणं सापडलं अनुवादात, नंदनला ऑडेनचे नेमके संदर्भ नि सईला तुमको देखा मधली सहजसोपा प्रगल्भता...माझ्या दृष्टीने हा खो सुफळ! संवेद धन्यवाद!
For a change, hya blog madhlya kavita(and the translations) kalalya mala .. hya aadhichya posts pan vachlya aahet me, pan mala faar kahi kalala nahi, mhanun comment nahi keli :( Well done on this one! :)
ReplyDeleteआवडले अनुवाद.
ReplyDeleteभारी लोक आहात सगळेच :)