कधी समुद्राच्या लाटांकडे बघत किनार्यावर बसावं आणि विचारून पहावं की या लाटा नेमकं काय करताहेत?...
समुद्रात बंदिस्त राहून कंटाळल्यामुळे किनार्यावर येताच जरा वाट सोडून धावत असाव्यात. समुद्राच्या भरती ओहोटीशी एकरूप होऊन किनार्यावर त्या जाणीवा उमटवत असाव्यात. गंगोत्रीत पाझरलेल्या थेंबापासून दक्षिण गंगोत्रीत वितळलेल्या हिमाच्या थेंबापर्यंतचं आपलं सारं अनुभवाचं गाठोडं किनार्यावर सोडत असाव्यात. कधी मधेच आलेल्या खडकावर फुटून उत्स्फुर्तपणे व आर्ततेने किनार्यावर झरत असाव्यात. कधी गर्त्याच्या खोलीचा किनार्याला नेमका अंदाज देत असाव्यात. कधी त्यांच्यातील लयीचं संगीत करत असाव्यात तर कधी त्या लयीवर स्वार होत गुणगुणत पाण्याचे थेंब किनारा गाठत असावेत. किंवा कदाचित कुठल्याशा पृथ्वीवरही नसणार्या चंद्रसूर्यांच्या तालावर नाचत असाव्यात. प्रत्येक वेळी या प्रश्नाचं उत्तर वेगळं असेल. पण हे सगळं सामावून घेणारं एक उत्तर सध्या असं वाटतंय की, ह्या लाटा समुद्राची सगळी ऊर्मी किनार्यावर उधळून देत आहेत, चंद्रसूर्य केवळ निमित्तमात्र.
लिखाणाची ही ऊर्मी नेमकी कशात आहे हे सांगणं कठीण आहे. अनेक गोष्टींची ती एकत्रित परिणती आहे. कधी गाज नसलेला पाऊस ती जागवतो तर कधी भयाण शिशिर. कधी स्वतःची मनःस्थिती एखादी लहर निर्माण करते, किंवा बर्याचदा तीची अव्यक्तता तशी लहर निर्माण करते. कधी एखादी नितांत सुंदर अभिव्यक्ती दाद द्यायला भाग पाडते. कधी कुठल्या क्रौर्याने आलेल्या विषण्णतेवर एखादी लाट फुटत असते. आसपासची राजकीय, सामाजिक परिस्थिती तर नेहमीच लाटा प्रवृत्त करत असते. बर्याचदा यातली एखादी गोष्ट निमित्तमात्र ठरते नि उठणारी लाट जाणीवेत असणारे सर्व विचार पार्श्वभूमीला ठेवते. कधी एक खेळकर ऊर्मी असते, चालीशी, शब्दांशी खेळण्याची. वरवर खेळ, पण बर्याचदा विचारपूर्वक अभिव्यक्ती. निदान उथळ पाण्याचा खळखळाट न करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न.
मला वाटतं जर एका शब्दात उत्तर द्यायचं असेल की काय आहे म्हणून लिहिणं आहे, तर "विचार" असं मी म्हणेन. अगदी रेने देकार्तेच्या "I think, therefore I am" च्या धर्तीवर "I think, therefore I write" असंही म्हणेन. ते मूळ आहे. मग त्यानुरुप माध्यम. चीड व्यक्त करायला उपहास, थेट मनातलं असेल तर कविता हे सगळं नंतरचं. सर्वांच्या मूळाशी अव्याहत चाललेला विचार. निदान काही जाणवलेलं व्यक्त करण्यापेक्षा त्याचं विश्लेषण करून ते व्यक्त करण्याचा, काही नवीन करण्याचा प्रांजळ प्रयत्न. किनार्यावर उमटलेल्या प्रत्येक लाटेसह विचार प्रगल्भ व्हावेत व लेखन समृद्ध व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.
हा विचार डोक्यात आणवल्याबद्दल मेघनाचे नि ही लाट निर्माण करायला निमित्त ठरल्याबद्दल राजचे मनापासून आभार.
माझा खो केतनला.
he uttar manapasun patala.. rather jast jawalacha vatla!
ReplyDeleteखेळात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार.
ReplyDeleteI think, therefore I write... :-)
सुंदर. लिहीण्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन. आवडला.
ReplyDeleteराज - exactly!
ReplyDeleteसेन - लिहिण्याबद्दलचा ’हा’ outlook आवडला!
मला तर ’खळखळाट’ लपवायचा मेजर प्रयत्न करावा लागतो! :))
well said! vaachlyaavar manaat aala,
ReplyDelete"arey ho! kharach ki! mhanun-ch tar writing becomes such a natural process. mala kasa nahi suchla" :)
thanks for the "kho". lihito hya weekend la. :)
लाटा समुद्राची सगळी ऊर्मी किनार्यावर उधळून देत आहेत, चंद्रसूर्य केवळ निमित्तमात्र.>>>>>.
ReplyDeleteखळखळाट ह्वु न देता अविस्मरणिय करण्याचा प्रय्त्न खर आहे..
छान आहे
ReplyDeleteshevti raahavala naahi.
ReplyDeleteweekend agodarch lihun taakla :)
@Jaswandi,
ReplyDeletenice to know that!
@Meghana,
:P
@Raj,
Thanks
@Abhijit,
Thanks n lol...:P
@M K,
thnx for prompt reply on "kho"...tyabaddal tuzya blogvar :)
@lopamudra, morpees,
abhar!
Yo..कदाचित "कुठल्याशा पृथ्वीवरही" नसणार्या चंद्रसूर्यांच्या तालावर नाचत असाव्यात ...good one
ReplyDelete