प्रति
आशुतोष गोवारीकर
चित्रपटासाठी भारताच्या तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भांचा canvas निवडण्याची तुमची ही तिसरी खेप आणि त्या canvas वर चित्रपटाची गोष्ट पार्श्वभूमीच्या आणि गोष्टीच्या बारकाव्यांसह समर्थपणे उभी करण्याचीही. त्यासाठी तुम्हांला तिसरा सलाम !
दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णु होणार्या ह्या समाजमनाला परमतसहिष्णुतेविषयी इतकी कळकळ असणारा एक राजा ह्या देशावर राज्य करून गेला, ही गोष्ट सांगायचं ठरवलंत त्याबद्दलही सलाम. त्या राजाने ही सहिष्णुता एक राजा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून, एक पती म्हणून, एक प्रियकर म्हणून, एक भाऊ म्हणून नि मुख्यत्वे एक माणूस म्हणून कशी जपली, हे दर्शविणार्या तरल अभिव्यक्तीलाही सलाम. ही गोष्ट जितकी अकबराची तितकीच जोधाची (अगदी "जैसे दो सूर हो मध्धम, ना कोई ज्यादा ना कोई कम राग में" इतकी). रयतेच्या हितासाठी प्रजाभिमुख राजाने केलेला व्यवहार, हे भयंकर प्राक्तन स्वाभिमानाने स्वीकारून एका बलाढ्य राजाला नि पर्यायाने राज्यसत्तेला प्रजाभिमुख करणार्या राजपूत युवराज्ञीची कथाही तितक्याच सशक्तपणे उभी केल्याबद्दलही सलाम.
तशा तिन्ही प्रेमकथाच. तिन्ही वेगळ्या. तिन्हींचे भिन्न संदर्भ. पहिल्या दोन्हींत खरं तर प्रेमकथा हा दुय्यम भाग होता, पण तुम्ही तोही अगदी हळुवार टिपला होतात. इथे प्रेमकथा केंद्रस्थानी होती. पण ही प्रेमकथा दोन राज्यसत्तांच्या राजकारणाची परिणती होती. साहजिकच तदनुषंगाने येणारे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे प्रेमकथेइतकेच महत्त्वाचे असणार. ज्या व्यक्तींचे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्य अभिन्न आहे, त्यांची प्रेमकथासुद्धा त्या संदर्भांशिवाय अर्थहीन ठरते. पण बर्याचदा फक्त प्रेमकथेला महत्त्व देण्याचा मोह दिसतो. आपण त्या मोहाला बळी न पडता जोधा व अकबर यांची स्वतंत्र व्यक्तिमत्त्वंही उभी केलीत, त्याबद्दलही सलाम.
सुरुवातीपासून अखेरपर्यंत जोधा व अकबर यांच्यावरचा focus जराही विचलित होऊ दिला नाहीत, हे आवडलं मला. जोधा - अकबराच्या कथेत बिरबलाच्या चातुर्यकथांचा मसाला भरला नाहीत, त्याबद्दल आभार. किती नानाविध माध्यमांतून तुम्ही नि तुमच्या सहकार्यांनी काही ना काही व्यक्त केलंय. म्हणजे माझं त्या सर्वच माध्यमांबद्दलचं ज्ञान अगाध असलं तरी माझ्या सामान्य बुद्धीला जे जे रुचलं ते ते पाहून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं असं वाटलं. जोधाला परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या अकबराच्या स्वागताच्या दृश्यात भगवा रंग नुसता भरलाय आसमंतात. याआधी भगवा रंग एवढा आल्हाददायक कुठे पाहिला होता हे आठवावंच लागेल. जलालचं अकबरीकरण होतानाच्या गाण्यात तर रंग नि नृत्याची नजाकत भरली आहे. पण जेव्हा "ख्वाजा मेरे ख्वाजा" म्हणताना हिंदुस्तानचा बादशाह तन मन अर्पून त्यात एकरूप झाला ना तेव्हा त्या नृत्याच्या सादगीतून केवढी मोठी अभिव्यक्ती केलीत तुम्ही. तेव्हाच इतिहासाचे, नि घटनांच्या तपशीलांबद्दलचे फिजूल प्रश्न संपूर्ण निरर्थक झाले. अकबराचं एवढं सुरेख interpretation विरळाच ! त्या गाण्यासारखंच संपूर्ण चित्रपटात राजेशाही डामडौलात जपलेल्या त्या काळाच्या उपजत साधेपणासाठी सलाम.
रहमान, जावेद अख्तर हे तर "प्रतिभा गहाण टाकल्यास जग विकत घेता येईल" या categoryत मोडत असल्यामुळे ती बाजू उत्तमच असण्याची स्वाभाविक अपेक्षा होती. पण ह्या दोघांनी चित्रपटागणिक कलेला अधिक उंचीवर नेण्याची प्रथा इथेही अखंडित ठेवली आहे. लगानमध्ये त्यांनी "मितव्या"ला हाक मारली होती, स्वदेसमध्ये "देख त्यजकर पाप रावण, राम तेरे मन में है" अशी विचारघन वाक्यं सहज फेकली होती. नेहमीच चळवळींची गाणी वाटलीत ती मला. इथे तर म्हणजे थेट भजनापासून सुफी कलामांपर्यंत नि तरल प्रेमगीतांपासून भाटांनी राजाच्या स्तुतीसाठी लिहावं, अशा गीतापर्यंत प्रतिभा नुसती ओसंडून वाहतेय. ज्या प्रतिभेला तुमच्या बहुतांश समकालीनांच्या अगदीच सरधोपट कथांमध्ये वाव मिळणे कठीण आहे, तिची योग्य कदर केल्याबद्दल सलाम. रहमान तर बहुदा पहिल्यांदा वाक्यातले शेवटचे दोन शब्द आणि शब्दातील शेवटची दोन अक्षरं संगीतात दडपून न टाकता (बर्याच अंशी) गायला असेल.
माझ्याबरोबरच्या साधारण वीस पंचवीस लोकांना हा चित्रपट रटाळ वाटला, त्यामुळे हा काही सार्वत्रिक लोकप्रिय नाही. नसू देत. सोळाव्या शतकातल्या दोन राज्यसत्तेंमधल्या राजकारणातून जन्मलेली हळवी प्रेमकथा, त्यातून जन्मलेले एक परिपक्व नातं, त्यातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण व त्याचा संबंधित राज्यसत्तांवर नि व्यक्तिमत्त्वांवर झालेला व्यापक परिणाम, हे सगळं एकविसाव्या शतकासारखं चित्तथरारक, वेगवान वगैरे वगैरे असावं अशी अवाजवी नि अर्थहीन अपेक्षा करणार्यांचा त्यात दोष आहे, तुमचा नाही. सर्व शांतताप्रिय, धर्मनिरपेक्ष भक्तीपंथांत (मग सुफी असो, वारकरी असो वा इतर) असणारा निखळ साधेपणा ज्यांना भावला नाही, ते ख्वाजा मेरे ख्वाजा ह्या गाण्याला हसले असतील. तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही जोधा अकबर यशस्वी साकारला आहे आणि एक अजून छान चित्रपट पहायला मिळाल्याचं समाधान दिलं आहे.
जेव्हा बरेचसे इतर लोक अत्यंत थिल्लर चित्रपट खोर्याने काढत आहेत, तेव्हा तुम्ही ही तिसरी सशक्त कलाकृती निर्माण केली आहे. एकंदरीत सर्वत्रच द्वेष, असहिष्णुता यांचेच उदात्तीकरण दिसत असताना आपण आपल्या या तिन्ही चित्रपटांमधून नेहमीच प्रेमाला महत्त्व दिलं आहे, देशप्रेमासकट. मला वाटतं, हा आपल्या वृत्तीचा परिणाम असला पाहिजे. जोधा अकबर हे एक त्याच सर्जनाचं भव्य मूर्त रूप आहे. असे अनेक प्रेमाचे कलमे गाणार्या तुमच्यातल्या फरिश्त्याला सलाम !
वाचावं की सिनेमा पाहून होईपर्यंत थांबावं अशी ओढाताण करून घेण्याची ही गेल्या दोन दिवसांतली तिसरी खेप. अखेर वाचावंच, असं ठरवून वाचलं - काय होईल ते होईल.
ReplyDeleteसुरेख लिहिलं आहेस...
सहिष्णुता, ऐतिहासिक-राजकीय संदर्भ, संयत अभिव्यक्ती आणि बिरबल आणण्याचा टाळलेला मोह - आशुतोष गोवारीकरांनी हॅटट्रिक केलीय म्हणायची की. आता कधी एकदा पाहीन असं झालंय..
अरे सही लेख! ब्राव्हो! अजून चित्रपट पाहिला नाही पण लेख वाचल्यावर पहावाच लागणार.
ReplyDeletei hvnt seen the movie yet, but the more i read abt it - the expectations are builiding up.
ReplyDeletefantastic review - without letting out the details of the plot, the intricacies, or anything else - you have covered so many aspects of the movie - primarily an insight into what the director wants to say. most of the times, we are overwhelmed by the actors, the music, the sets, the dialogues - hya saglya madhe, tya movie cha director kuthe tari harvun jaato.
aata ha cinema lavkar ch baghitlaa paahije!
परफ़ेक्ट लिहिलं आहेस. छान टिपले आहेस बारकावे.
ReplyDeleteमला तर हा चित्रपट स्लो आहे, किती मोठा आहे आणि म्हणून रटाळ आहे वगैरे म्हणत उगीच ना्वं ठेवणार्यांना आता काही रिस्पॊन्डच करावसं वाटत नाही.चुक त्यांची नाही. मल्टीप्लेक्सच्या सोयीचे पावणेदोन तासांचे चित्रपट पाह्यची सवय झाल्यावर एखाद्या संथपणे कथेची मागणी पुरी करत प्रसंग खुलवत नेणार्या मोठ्या लांबीच्या सीनमधले सौंदर्य, बारकावे टिपत जाण्याची त्यांची क्षमताच कमी झालेली असते.
तसंच भव्य कॆन्वासचे चित्रपट काढताना अगदी क्षुल्लक अशा काही तपशिलातल्या चुका झाल्या (ज्यांचा कथानकावर काहीही वावगा परीणाम होणारा नसतो) तर तितक्याच पकडून चित्रपटाची टर उडवणं हे ही निव्वळ WSBD Syndrome चं लक्षण असतं असं वाटतं.
I agree, the movie is not boring definitely, but only thing is it is a little bit on the longer side. Well, I really liked the way in which you have praised Ashutosh Gowariker, I too think he has done a good job in creating the movie; in convincing a general mob that this was the "Mughal" era; this is how it looked like. The sets, the architecture and all of the grandiose appearance; looks like similar to Lagaan and Swades, he has invested a lot of money and time in first making up an altogether new movie in his own mind first. One good thing I also noticed was that, the dialogue writers have done a praiseworthy job of exhibiting the difference in the Hindi, Akbar speaks (I mean Urdu) and the one Jodha speaks. All these things indeed are true...
ReplyDeleteHowever, I had two questions:
What about the recent media hype about the story being false and that Jodha Akbar were never married? I mean this just takes away the basis of the movie..And AG is not that stupid to make a mistake this fundamentally.
Also, the cast says there is a Birbal (Maheshdas) in the movie, may be I missed it or was just ignorant. But, which is that scene with Birbal?
@ Meghana,
ReplyDeleteYou summarized well - yes, I think its hat-trick! aata pahun mag sang tuza mat.
@ Raj,
Jarur paha ni pahun kasa vattoy te pan sang!
@ M K,
khara aahe... mala vatta changlya goshti changlya present karaychi veglich hatoTi aahe AG chi...mazya alpamatila aawadala te lihila evdhach...pahun kasa vattoy te sang.
@ Tulip,
Thanks. You said it! WSBD Syndrome mhanje nemaka kalla nahi..paN tuza mhaNana paTla.
@ Shraddha,
length of movie: Tulip said it!
dialouge: yess, and not just tht even lyrics: listen to the in lamho ke daman me duet and notice the difference between male and female versions!
ur Q.1: thats stupid...everyone involved in movie has answered to it... mi kay vegla sangu...mala te kadhich padle navate tasehi!
ur Q.2: I think he may be the guy who is with him & todarmal in the scene where they disguise as a common man...but anyways...tyahun adhik kahi navata hech bera hota!
Read this shraddha. Annurag kashyap on Jodha-Akbar controversy >>>
ReplyDeletehttp://epaper.timesofindia.com/Daily/skins/MM/navigator.asp?Daily=MMIR&login=default&AW=1203649757546
Tulip,
ReplyDeleteThanks. But, I could not find this article. COuld you please give the paper/date/page no.?
Thanks.
ohh open nahi hotay ka hi link? aajacha mumbai mirror (feb.24th)(epaper bagh) madhe 'Views' page no. 31.
ReplyDeletearre ajun pahila nahiye cinema.... apratim lihilays tu... i cnt wait to see the movie now....
ReplyDelete@Tulip,
ReplyDeleteThanks. Just a correction it is Feb 22 :)
Well-written article with apt references to khuda ke liye and CA writer's strike.
Shraddha, please read it.
@Snehal,
Bagh na paTkan.
सेन- सही लिहिलयस.
ReplyDeleteतु आणि ट्युलिपने कंप्लिट वेगळ्या गोष्टी लिहिल्यात आणि पिक्चर पाहुन मला आणखीनच वेगळ्य़ा गोष्टी (चांगल्या) दिसल्या - त्याबद्दल झेपेल तेवढं लिहिनच, पण या लेखाबद्दल तुझं अभिनंदन केल्याशिवाय रहावलं नाही.
@ अभिजित,
ReplyDeleteमनापासून धन्यवाद. तू, ट्युलिप व श्रद्धा या तिघांनीच चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिल्यात आत्तापर्यंत, म्हणून त्या अधिक विशेष.
ट्युलिपपेक्षा वेगळं लिहिण्याची दोन कारणं. एक म्हणजे मला पाहिल्यापासून हेच लिहायचं होतं. नि दुसरं असं की कथा शक्यतो टाळायची होतीच, पण कदाचित कथेला थोडासा स्पर्श झाला असता. ट्युलिपचं पोस्ट हा लेख अर्धवट असताना वाचलं. तिने ते इतकं भारी लिहिलंय की मी कथेला शिवायच्या फंदातच पडलो नाही. :)
तुला काय वाटलं ते लिहिच. वाट पाहतोय.
WSBD ( white space black dot) syndrome mhanjech ' yes but...' syndrome suddha.
ReplyDeleteSane man!! and Tulip!!
ReplyDeleteThanks for the article reference...I am equally excited to read the article...but could not find it :(
Is it possible to forward it again?
Thanks!!
@ Tulip,
ReplyDeleteAchhachha! thnx :)
@ Shraddha,
Tulip chi nantarachi comment bagh:
"aajacha mumbai mirror (feb.24th)(epaper bagh) madhe 'Views' page no. 31." --->with a correction, It is Feb 22 and not Feb 24. You should be able to find it!
Hey Thanks guys,
ReplyDeleteI read the review in Mumbai Mirror..it is well-written and convincing...whatever may be the history because, Wikipedia search of the film says that Jodha and Akbar were never married. But, whatever Anurag Kashyap says is also true, if they wanted to raise voice against it, the time was not when film was being showcased but when it was announced.
Anyways...I enjoyed the film!!! :)
खरं तर ऐतिहासिक कादंबर्यांचे दाखले इतिहासासाठी वापरण्याची खोड अगदी वाईट. पण आठवण झाली खरी. त्यामुळे हा कसलाच दाखला नव्हे, फक्त संदर्भानं आलेली आठवण...
ReplyDelete'श्रीमान योगी'तला एक प्रसंग. देवीचा गोंधळ. आणि समोर बसून तो पाहणारा-अनुभवणारा शिवाजी. पाहता पाहता तो उठतो आणि देवीची पोत नाचवण्यासाठी रिंगणात उतरतो. राजा असल्याचं जणू सुटून गेलेलं भान. अंगांगात उतरलेला आवेग. भिनणारी लय... बाकी सगळं निरर्थकच. एकरूप होऊन जायचं आहे फक्त...
व्यापक कल्याणाच्या कल्पनेनं झपाटलेल्या राज्यकर्त्याला हे आध्यात्मिक अधिष्ठान अपरिहार्यच की काय? मग धर्म कुठलाही असो...
त्यातूनच मिळत असेल त्याला ताकद ही विलक्षण स्वप्नं पाहण्याची-पेलण्याची?
धर्माच्या कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन व्यापक हिताचा वेध घेण्याची?
त्यासाठी कर्मठ धर्ममार्तंडांशी लढून बंडखोर आणि क्रांतिकारक निर्णय घेण्याची?
काळाच्या पुढे पावलं टाकण्याची?
'ख्वाजा मेरे ख्वाजा..'नं अशी अनेक अर्थांची-प्रश्नांची वर्तुळं जागवली. रहमानचे करुण आर्त सूर, मंद सोनेरी प्रकाशानं भारलेला अवकाश आणि स्वत्त्वाचं भान हरपून सर्वसाक्षी ईश्वराला शरण जाणारा जलाल...
त्यासाठी आशुतोष गोवारीकरला काही क्षुल्लक त्रुटी माफ...
मेघना,
ReplyDeleteअप्रतिम. मी श्रीमानयोगी वाचलं नाहीये, पण तू संदर्भ उभा केलास डोळ्यासमोर. मस्त!
तुझ्या प्रश्नांनाबद्दल , बहुदा तो सनातनी विरुद्ध पुरोगामी यांच्यातील संघर्ष असावा. धर्मग्रंथांवर हात ठेवून कारभार करणार्या राज्यकर्त्यांना बहुदा पुरोगामित्वाचं बळ आध्यात्मिक अधिष्ठानातून मिळत असेल पण संविधानांवर हात ठेवणार्या प्रशासनांसाठी ते अपरिहार्य नाही. पुरोगामित्वाचं बळ नैतिक अधिष्ठानात असतं. मग त्याचा स्रोत आध्यात्मात असेल वा व्यापक माणुसकीत असेल वा इतर कशात हा व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. असो.
its really fantastic review!!!!!1
ReplyDeleteसेन, सुरेख सिनेमा आणि सुरेख रिव्ह्यु...
ReplyDelete'जोधा अकबर' जुना झाला की राव. आता लिहा... 'मिथ्य' पाहिलास का रे? तू लिही ना त्याच्यावर.
ReplyDelete@Meghana
ReplyDeletenahi ga pahilay mi...pahin...
ekamagomag ek 2 posts zali na pictures var...agadi chitrpaT samikshak asalyasaarakhi...:D
sadhya jara lay kam aalay...kadhin veL... :)
Nimish, I saw film after reading article in Indian Express of Kishwar Desai.I also now see why some people coppose film .It reminds me of novell by Kiran Nagarkar which you must read Cuckold is title of novell It is on life ofMirabai's husband. But your article was bit more comment on content I also think it could have been short Whirling darvesh I saw in Istanbull so it seemed very dear. sadhana
ReplyDeletearre khooop zala aata lihi na....
ReplyDeleteani ho eka goshtichi daad dyaychiy
बहुदा तो सनातनी विरुद्ध पुरोगामी यांच्यातील संघर्ष असावा. धर्मग्रंथांवर हात ठेवून कारभार करणार्या राज्यकर्त्यांना बहुदा पुरोगामित्वाचं बळ आध्यात्मिक अधिष्ठानातून मिळत असेल पण संविधानांवर हात ठेवणार्या प्रशासनांसाठी ते अपरिहार्य नाही. पुरोगामित्वाचं बळ नैतिक अधिष्ठानात असतं. मग त्याचा स्रोत आध्यात्मात असेल वा व्यापक माणुसकीत असेल वा इतर कशात हा व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. असो.
too good....
bhalya bhalyana kalat nahi he....
mala asa mhanych asta tari etkya perfect shabat mandta nasta aala
keep it up...
waiting for the new post... :)
तू कविता लिहिणं बंद केलंस, की छापणं? आय मिस देम..
ReplyDelete@Aatya,
ReplyDeleteThanks for the reference to Whirling darvesh...will try to read the book you mentioned...
@Snehal,
thnx...:)
zopa kay ithe zop udalya evdha kam aahe!
@Meghana,
Kamat budloy...sahdya chhapaNa mhaN...juLavaNa tar sadodit chaluch asata..kaLat nakaLat!
a sane man,
ReplyDeletemi tula tag kelay lihiNyabaddala lihayala :-)
हेहेहे! तुला खो दिला आहे राजने. आता तर लिहिशीलच ना!
ReplyDeleteया लेखाला प्रतिक्रिया देण्याच्या निमित्ताने माझा अडगळीत पडलेला blog मी लिहायला काढला. वाच.
ReplyDelete@ पुस्तकातला किडा,
ReplyDeleteblog chi link deta yeil ka?
Thanks.
http://manmokala.blogspot.com
ReplyDelete