मी पडलो होतो, हेही खरेच आहे
मी चिडलो होतो, हेही खरेच आहे
एकटा एकदा, नजरा चुकवत, रुक्ष मनाने
मी रडलो होतो, हेही खरेच आहे
मी असे बोललो, हेही खरेच आहे
मी तसे बोललो, हेही खरेच आहे
बोलणे खुंटता, मूक बोल हे, उघडपणाने
मी कसे बोललो? हेही खरेच आहे
जग भकास होते, हेही खरेच आहे
मन उदास होते, हेही खरेच आहे
थांबल्या क्षणांचे, बेटावरले, खुल्या दिशेने
ते प्रवास होते, हेही खरेच आहे
मी कधी न आलो, हेही खरेच आहे
मी कधी न गेलो, हेही खरेच आहे
जाता येता, सांजसकाळी, हमरस्त्याने
मी कुणा न दिसलो, हेही खरेच आहे
मला नाही आवडत तुझा हा मूड. खेरीज नेहमी तुझ्या अशा मूडला एखादी क्षमाशील-उदास-हसरी किनार असते तशीही ती इथे नाहीय...
ReplyDeleteबाकी कविता अर्थाच चांगली आहे, पण कवीच्या कौशल्यापेक्षा कवितेमुळे जागे होणारे मूड्स याच खर्या व्हॅलिड प्रतिक्रिया ना?
meghana,
ReplyDeletetuzya pahilya vakyavar nantar pratikriya...atta zop yetey...paN dusara vakya..."पण कवीच्या कौशल्यापेक्षा कवितेमुळे जागे होणारे मूड्स याच खर्या व्हॅलिड प्रतिक्रिया ना?" mhanaje kay? kaviche kaushalya kashat asata? mhanaje kaushalya aaNi kavita bhinna kasa asu shakata...mala nahi kaLLa he vakya...as i said pahilya vakyavar nantar pratikriya...
meghana mhante te barobar ahe asa kahi wachla na tuzya blog war ki mag te kiti sundar lihilay asa na hota tuzi kalgich watayla lagte mala... mag comment deta nahi yet neet...
ReplyDeletetu khoop matured lihitos... bhasha ani arth ya donhi goshtinchi shrimanti janawte tuzyya lihinyat... keep it up!!
Nice blog really...followed your comments on my blog. Who are you? Do I know you?
ReplyDeleteकवीचं कौशल्य भाषेवरच्या प्रभुत्वात. म्हणजे ’दुपार सरून सुरू होतो संध्याकाळचा खेळ..उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ..’ हे भाषेवरचं प्रभुत्व. आणि ’मला दु:खाइतकं मोठं व्हायचंय गालिब...’ ही प्रभुत्वाला पार्श्वभूमीला ठेवत उंच जाणारी कविता. दोन्ही गोष्टी वेगळ्या होऊ नयेत खर्या. पण कधी कधी होतं असं.. अर्थात हेही सब्जेक्टिव्हच!
ReplyDeleteतर असं कौशल्य जाणवलं. पण त्यातला उदास भाव नाही आवडला. नेहमीसारखा सर्वसमावेशक-क्षमाशील नाही वाटला. स्वत:च्याही बाबतीत...
सगळेच ठोकताळे चुकतात कधी.
ReplyDeleteनाही लागत कुठलेही संदर्भ.
शहरातून एकदम गावात गेलं की कसं आकाश भरगच्च दिसतं,
नि मग दडपून जायला होतं.
इतकं की ध्रुवही सापडत नाही.
बाकी गच्च भरलेल्या आकाशाचं काही नाही.
त्यानं दचकायला होतं, अस्वस्थही वाटतं कधी.
पण नेहमीचे ठराविक तारे दिसले की बाकीची नुसतीच गर्दी.
"हे शहरात दिसतं नाही. गावात काय मजा आहे ना!"
एक बावचळलेलं हृदय लयीत आणणारा आशावाद.
पण ध्रुवाचं तसं नसतं.
तो नाही सापडला तर सगळंच कोलमडतं.
मग घाबरायला होतं.
जीव कासावीस होतो.
सप्तर्षीचे तारे जोडून काढलेली रेषा चांदण्यात हरवते.
शर्मिष्ठा अजून उगवतीवरही नाहीत.
तरी प्रयत्न चालू.
एकटेच.
मग मुद्दामून स्वतःला शिक्षा करून घेऊन वेगळं बसून निरखून पहायचं.
नुसतंच टक लावून.
नजरेने फक्त पाहायचं, मेंदूत काहीच प्रक्रिया नाही.
वाटतं सगळ्यांसोबत बसावं, एकटेपणा जाईल.
पण म्हणजे नेमकं कोणासोबत?
काहींना तो ध्रुव कधीच शोधायचा नव्हता,
काहींनी तो नाद सोडून दिला होता,
तो दिसत वा दिसला कुणालाच नव्हता.
काहींना तो न सापडण्यात काय नेमकं बिघडतंय, याचाच पत्ता लागत नव्हता.
ध्रुव शोधायचा इतरांपैकी कुणालाच नव्हता.
मग एकटंच फिरायचं.
कंटाळा येईस्तोवर.
असह्य झालं की शब्दांचे खेळ करायचे.
कुणी दाखवतं आस्था, कधी स्वतःचंच मनही.
"खरंय हे तुझं म्हणणं पण, ध्रुव नाही सापडत आहे, हेही खरंय ना?"
शब्दांचं बरं असतं अशावेळी तुम्ही म्हणाल तसे निमूट बसतात ओळीत
नि म्हणाल तसा अर्थ निर्माण करतात.
हा संवाद सोपा आहे.
आपल्या म्हणण्यावर त्यांचं म्हणणं गृहीत धरलेलं असतं...नि तेही कसे हवं तेच बोलतात.
कुठून एक गावातला लहानगा येतो.
त्याला पाठवलंय बाकीच्यांनी...
त्यांना माझी काळजी आहे नि स्वतःला सोयरसुतक नसलं तरी माझ्या शोधाचं कौतुक आहे..
मी ओशाळतो.
त्याला भलतंच कुतूहल.
त्याला तर ते आकाश रोजचं आहे.
पण त्याला माहितंच नाही ते असं पाहायचं असतं ते.
त्याची आकाश शोधायची धडपड चालू आहे.
माझ्या क्षुल्लक प्रश्नांची माझी मलाच लाज.
"मी मदत करू तुला आकाश शोधायला?...
पुढल्या वेळेस तू मला शिकव या गर्दीत कोणाला कसं हुडकायचं ते...
माझ्या पुढे जायचंय तुला..."
या क्षणीही शब्द बरोबर असतील असं वाटलं होतं...
पण त्यांना बहुदा माझ्या आधीच माझी लाज वाटू लागली होती.
ते खरंय म्हणत केव्हाच निसटले होते.
नाही म्हणायला संदीपछाप काही मागे उरले होते.
मी शोधतोय त्यांना आता...
...................................
मेघना, स्नेहल
तुमचं म्हणणं खरं आहे. पण माझी चिडचीड पोचली नि मूड खराब करून गेली. यातच भावना पोहोचल्या. बहुदा तीच valid प्रतिक्रिया होती.
स्नेहल,
खूप खूप धन्यवाद तुझ्या प्रतिक्रियेबद्दल.
मनिष,
I don't know you. I found your blog randomly. Thanks for your comments.
मेघना २,
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल नि स्पष्टीकरणाबद्दल मनापासून आभार...
"काहींना तो ध्रुव कधीच शोधायचा नव्हता,
ReplyDeleteकाहींनी तो नाद सोडून दिला होता,
तो दिसत वा दिसला कुणालाच नव्हता.
काहींना तो न सापडण्यात काय नेमकं बिघडतंय, याचाच पत्ता लागत नव्हता.
ध्रुव शोधायचा इतरांपैकी कुणालाच नव्हता."
अफाट प्रामाणिक, आर्त-सुरेख झालंय..
आणि अरे मीच लिहिली दुसरी प्रतिक्रिया. पण चुकून दुसर्या आय.डी.ने लॉग इन केलेलं असताना लिहिली. :P
chayla sane tu barach gambhir zhalela distoyes! Easy ghe
ReplyDeleteतुफानोसे कह दो गिर के उठे
ReplyDeleteहम प्यार के दिप जलाते है !
whr r u???????
ReplyDeleteकाहीतरी खोलवर वाचल्यासारखे वाटले!
ReplyDelete@Kulu,
ReplyDelete:)
@Harekrishnaji & Sangram,
मनापासून आभार.
@meghana
इथेच आहे :)
Liha aata
ReplyDelete