वाटा
Friday, April 1, 2011
सकाळ सकाळची गोष्ट आहे
जेव्हा ह्या वाटा निघतात इथून
दवात नि सांडलेल्या दुधात न्हाऊन
झाडूंनी खसाखसा अंग पुसून
गंधफुलांचे सडे माळून
मावळत्या दिव्यांत चाचपडत
बातम्या पोचवत
जातात इथून
आठेक वाजता जेव्हा
चहा पिऊन घरातून निघतात
तेव्हा जगबुडीच्या लगबगीने
स्टेशनकडे धावतात
नि गर्दीत स्वत्व हरवून
मिसळून जातात
मग ह्या बोळातून निघून
त्या गल्लीतून
तिकडच्या कंपाउंडवरून उडी मारून
चार घरं चुकवून
तिठ्यावरच्या चिंचेला वळसा घालून
गाड्यांना न जुमानता रस्ता क्रॉस करून
चौकात मेन रोडला लागतात
ही साधारण अकराएक वाजताची गोष्ट आहे
भर दुपारी
कल्हईवाले नि बोहारणींना
येणाजाणार्या मोलकरणींना
ईशान्त नाव असलेल्या मुलाला
कुणी थेट स्वयंपाकघरातून मारलेल्या
हाय पीच हाकांना
घराबाहेर टाकलेल्या कोळंबीवर
तुटून पडलेल्या कावळ्यांना
नि मांजरींच्या म्यावांना
खरकट्या पाण्याचे खिडकीतून
बिनदिक्कत खाली टाकलेले सडे झेलून
सुक्या पाचोळ्याने दिलेल्या करकरीत शिव्यांना
मुळीच भीक न घालता
बिल्डिंगांच्या आडोशाला
जऽरा पडतात
तेव्हा जिवाला किती गार वाटतात
दुपारच्या झोपेतून उठून
ग्लानीतच गप्पपणे
उन्हं कलण्याची वाट बघत
दबा धरून बसलेल्या वाटा
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो
ह्या वाटांवरच्या संध्याकाळी
कधीच एकट्या येत नाहीत
कधी वारा येतो
कधी गजरा येतो
कधी चक्क वळवाचा पाऊस येतो
अनावर ओढीनं निघालेली
येणारी, जाणारी, परतणारी
माणसं दिसली
की वाटा लगोलग आपली दिशा बदलून
त्यांना वाट मोकळी करून देतात
तेव्हा वाटांच्या दुसर्या टोकांना
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन
ज्या विवक्षित वेळी
कूकरच्या शिट्ट्यांचे
टीव्ही सिरीअलच्या शीर्षकगीतांचे
नि सामुदायिक बोलण्यांचे
आवाज बंद होतात
तेव्हा कुठे वाटांवर रात्र होते
सोडिअम वेपरच्या प्रकाशात चमचमणारी
अभ्यासाच्या, इंग्लिश सिनेमांच्या
नि गजराअत्तरांच्या
काही चुकार वाटा सोडल्या
तर सगळे फूटपाथ,
रस्ते, पथ,
स्ट्रीट, रोड
बोळ, गल्ल्या,
लेन, आळ्या,
पाऊलवाटा
झोपेतसुद्धा जात असतात
कुठूनतरी कुठेतरी
कशासाठी कळत नाही
पण रोज रोज जात असतात
मी येत असतो तेव्हा
मी जात असतो तेव्हा
मी वाट पाहत असतो तेव्हा
नि नसतो तेव्हा
मी कामात गढून जातो तेव्हा
नि फुकट बसतो तेव्हा
मला राहून राहून आठवतात तेव्हा
नि हो, मी त्यांना विसरतो तेव्हा
हो, अगदी तेव्हासुद्धा.
त्या वाटा निघतात इथून
नि दूर दूर जात राहतात
आत आत काळोखात
जेव्हा ह्या वाटा निघतात इथून
दवात नि सांडलेल्या दुधात न्हाऊन
झाडूंनी खसाखसा अंग पुसून
गंधफुलांचे सडे माळून
मावळत्या दिव्यांत चाचपडत
बातम्या पोचवत
जातात इथून
आठेक वाजता जेव्हा
चहा पिऊन घरातून निघतात
तेव्हा जगबुडीच्या लगबगीने
स्टेशनकडे धावतात
नि गर्दीत स्वत्व हरवून
मिसळून जातात
मग ह्या बोळातून निघून
त्या गल्लीतून
तिकडच्या कंपाउंडवरून उडी मारून
चार घरं चुकवून
तिठ्यावरच्या चिंचेला वळसा घालून
गाड्यांना न जुमानता रस्ता क्रॉस करून
चौकात मेन रोडला लागतात
ही साधारण अकराएक वाजताची गोष्ट आहे
भर दुपारी
कल्हईवाले नि बोहारणींना
येणाजाणार्या मोलकरणींना
ईशान्त नाव असलेल्या मुलाला
कुणी थेट स्वयंपाकघरातून मारलेल्या
हाय पीच हाकांना
घराबाहेर टाकलेल्या कोळंबीवर
तुटून पडलेल्या कावळ्यांना
नि मांजरींच्या म्यावांना
खरकट्या पाण्याचे खिडकीतून
बिनदिक्कत खाली टाकलेले सडे झेलून
सुक्या पाचोळ्याने दिलेल्या करकरीत शिव्यांना
मुळीच भीक न घालता
बिल्डिंगांच्या आडोशाला
जऽरा पडतात
तेव्हा जिवाला किती गार वाटतात
दुपारच्या झोपेतून उठून
ग्लानीतच गप्पपणे
उन्हं कलण्याची वाट बघत
दबा धरून बसलेल्या वाटा
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो
ह्या वाटांवरच्या संध्याकाळी
कधीच एकट्या येत नाहीत
कधी वारा येतो
कधी गजरा येतो
कधी चक्क वळवाचा पाऊस येतो
अनावर ओढीनं निघालेली
येणारी, जाणारी, परतणारी
माणसं दिसली
की वाटा लगोलग आपली दिशा बदलून
त्यांना वाट मोकळी करून देतात
तेव्हा वाटांच्या दुसर्या टोकांना
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन
ज्या विवक्षित वेळी
कूकरच्या शिट्ट्यांचे
टीव्ही सिरीअलच्या शीर्षकगीतांचे
नि सामुदायिक बोलण्यांचे
आवाज बंद होतात
तेव्हा कुठे वाटांवर रात्र होते
सोडिअम वेपरच्या प्रकाशात चमचमणारी
अभ्यासाच्या, इंग्लिश सिनेमांच्या
नि गजराअत्तरांच्या
काही चुकार वाटा सोडल्या
तर सगळे फूटपाथ,
रस्ते, पथ,
स्ट्रीट, रोड
बोळ, गल्ल्या,
लेन, आळ्या,
पाऊलवाटा
झोपेतसुद्धा जात असतात
कुठूनतरी कुठेतरी
कशासाठी कळत नाही
पण रोज रोज जात असतात
मी येत असतो तेव्हा
मी जात असतो तेव्हा
मी वाट पाहत असतो तेव्हा
नि नसतो तेव्हा
मी कामात गढून जातो तेव्हा
नि फुकट बसतो तेव्हा
मला राहून राहून आठवतात तेव्हा
नि हो, मी त्यांना विसरतो तेव्हा
हो, अगदी तेव्हासुद्धा.
त्या वाटा निघतात इथून
नि दूर दूर जात राहतात
आत आत काळोखात
9 comments:
Apratim!
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो
-- Kya baat hai!
अप्रतिम! एकदम मेट्रो झालीए कविता. असं वाटलं दादरच्या कुण्या बिल्डिंगीच्या गॅलरीत उभं राहून लिहितो आहेस. अगदी शब्दशः गेलं तरी वर्णनात्मक कवितांना नाळ जुळण्याचा जुनाच रोग असतो. पण हे काहीतरी वेगळंय. वाटा नुस्त्या वाटा राहील्या नाहीत विशेषतः शेवटच्या टप्प्यात (कडवं म्हणायला जीवावर येतय!). तसं त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं पण क्षणभर थांबून निरखणं किती महत्वाचं असतं नाही?
welcome back दोस्त ...
चक्क मुंबईत नेऊन सोडलस ... मजा आली वाचायला.
नंदन, संग्राम: थँक्स!
संवेद: अगदी. किती मस्त बोललास. समोर असतास तर टाळीने पुरले नसते, एक मोठी मिठी!
अगदी! घरी शांतपणे बसून गाणं ऎकणं सुखाचं टोक असतंच पण मैफिलीत लाईव्ह वा! निघालेली दाद दुर्मिळ आणि जीवघेणी असते..
कवितेतल्या ओळी उद्धृत नाही करायच्या आहेत, पण -
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन...
फारा दिवसांनी दाद अनावर झाली. परक्या शहरात असताना वाटा कशा माणसांसारख्या आठवून येतात, आठवत राहतात ते नीट ठाऊक आहे म्हणून. आणि तुझे अदृश्य छंद असलेली मुक्तछंदातली कविता फारा दिवसांनी भेटली म्हणूनही. या ओळी सोबत करतील...
मस्त रे! १८६९मध्ये गुस्ताव्ह फ्लोबेर याने सेंटिमेंटल एजुकेशन ही कादंबरी लिहीली. मॉडर्न रिअलिस्ट नॅरेशन (प्रतिशब्द?) या शैलीचा उगम इथून झाला असे मानले जाते. निवेदक रस्त्यावरून चालला आहे आणि एखाद्या कॅमेर्याने बघावे तसे सगळीकडे बघतो आहे. कविता वाचून या कादंबरीतील पॅरिसचे वर्णन आठवले. एक झलक :
The great walls of the colleges looked grimmer than ever, as if the silence had made them longer; all sorts of peaceful sounds could be heard, the fluttering of wings in bird-cages, the whirring of a lathe, a cobbler's hammer; and the old-clothes men, in the middle of the street, looking hopefully but in vain at every window. At the back of the deserted cafés, women behind bars yawned between their untouched bottles; the newspapers lay unopened on the reading-room tables; in the laundresses' workshops the washing quivered in the warm draughts.
मेघना - आभार! अशी कविता पोचली की खूप गार वाटतं.
राज - भलतीच इंटरेस्टींग माहिती. गझल म्हणून गझल लिहिणं नि लिहिलेली कविता गझल आहे असं आपल्या गावीही नसताना कुणी सांगणं ह्यातले इंटरेस्टींग पैलू नि आनंदाची प्रतवारी नेमक्या शब्दांत मला सांगता नाही येणार. अनेकानेक आभार ह्या नवीन गोष्टीशी ओळख करून दिल्याबद्दल. अधिक माहिती मिळवीन जमेल तशी.
(मॉडर्न रिसलिस्ट नॅरेशन = आधुनिक वास्तववादी चित्रण/वर्णन/कथन?)
किती सुरेख! खूप आवडली :)
'हा रस्ता कुठे जातो?' - ह्या विनोदानंतर दोन क्षण थांबून विचार करायला लावणारी आहे.
Post a Comment