यह जफ़ा-ए-ग़म का चारा

Tuesday, May 25, 2010

अबिदा परवीन ह्यांच्या स्वरातील गझलेची आवृत्ती येथे ऐकता येतील [१].

मूळ गझलेचे देवनागरी अक्षरांतर [२, ३] ---

यह जफ़ा-ए-ग़म का चारा, वह नजात-ए-दिल का आलम
तेरा हुस्न दस्त-ए-ईसा, तेरी याद रूह-ए-मरिअम

दिल-ओ-जाँ फ़िदाएँ राहें, कभी आ के देख हमदम
सर कू-ए-दिल फ़िगाराँ, शब-ए-आरज़ू का आलम

तेरी दीद से सिवा है, तेरी शौक़ में बहाराँ
वह चमन जहाँ गिरी है तेरी गेसूओं की शबनम

लो सुनी गयी हमारी, यूँ फिरें हैं दिन के फिरसे
वहही गोशा-ए-क़फ़स है, वहही फ़स्ल-ए-गुल का मातम

यह अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम

--- फ़ैज़ अहमद फ़ैज़

मराठी भाषांतराचा प्रयत्न [३] ---

गांजणार्‍या व्यथांवर उतारा, ती मनाच्या मुक्तीची झांजर
लावण्यात दयाहस्त येशू नि तुझी याद मरिअमचे अंतर

जीव ओवाळल्या पायवाटा कधी येऊन तूही पहा तर
विद्ध हृदयातल्या सर्व वाटा, आसावल्या रात्रींचा जागर

ज्या वसंता लळा लावला तू, तो नजरपारखासा तुला बघ
तो बहरला मळा, जेथ झरली वेणीवरल्या दवाची ती सर

दाद सादेस पाहा मिळाली, दिवस असेही येती फिरून कि
तोच तो कैदकोना इथेही, सुतकी तोच फुललेला मोहर

चालताना तुझ्या पायवाटे विचित्रसे हे येतात प्रलय कि
नाही गेलो पुरते लयाला वा झालो सचेतन त्यानंतर

[१] खालील दुव्याद्वारे आपण अन्य संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाल. त्या संकेतस्थळावरील संभाव्य प्रताधिकारभंगाचे उत्तरदायित्व ह्या सूचनेद्वारे नाकारण्यात येत आहे.
[२] ह्या मूळ कलाकृतीचे प्रताधिकार मूळ प्रताधिकारधारकांकडे, लागू होत असल्यास, सुरक्षित आहेत.
[३] मूळ साहित्यकृतीचे अक्षरांतर, अक्षरांतरित पुनर्मुद्रण, किंवा भाषांतराने कोणत्याही प्रताधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे त्या प्रताधिकारधारकांनी निदर्शनास आणून दिल्यास सदर मजकूर ह्या संकेतस्थळावरून वगळण्यात येईल.

4 comments:

Tulip said...

सहीए गझल ही! ऐकून जमाना झाला होता. आता परत ऐकतेच. बरेचसे उच्चार आणि अर्थ यांचा गोंधळ होता तो तुझ्या देवनागरीकरणाने आणि अनुवादाने नाहीसा होईल आता.
यह अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम >>> याचा अर्थ जमलाय तुला पण लय नाही उतरली. आणि लावण्यात दयाहस्त येशू नि तुझी याद मरिअमचे अंतर >> यातल्या 'लावण्यात' चा अर्थच कळेना कितीवेळ :))) बाकी आवडलं.' दाद सादेस पाहा मिळाली, दिवस असेही येती फिरून कि' हे खास!

बाकी खाली लिहिल्या आहेस त्या तिन्ही सूचनांची भाषा जबरी आहे. एकदम सुस्पष्ट वगैरे.

Samved said...

यह अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम.....

क्या बात!! मी प्रथमच वाचलं हे.

ज्या वसंता लळा लावला तू, तो नजरपारखासा तुला बघ
तो बहरला मळा, जेथ झरली वेणीवरल्या दवाची ती सर

दाद सादेस पाहा मिळाली, दिवस असेही येती फिरून कि
तोच तो कैदकोना इथेही, सुतकी तोच फुललेला मोहर

हे आवडलं.

तुझा बहुदा मुंबैत पुनर्जन्म झाला असावा आणि तू मुळचा पुणेकर असावास असं तुझ्या जब्बरी सुचना वाचून वाटतय. प्लीज कन्फर्म!

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

a Sane man said...

@ ट्युलिप,

आभार. हो ते शेवटचं कडवं मलाही फार रुचलं नाहीये. अर्थही उतरत नव्हता आधी. त्यासाठी खूप थांबलो, मग कंटाळून थांबलो शेवटी तो उतरल्यासारखा वाटला तेव्हा.
‘लावण्यात’...खिखिखि!

@ संवेद,

धन्यवाद. तुझी शक्यता अगदीच नाकारता येणार नाही... आधीच्या पिढ्यांचं काहीतरी उरलं असू शकतं अजून रक्तात! :-)

Post a Comment

  © Blogger templates Newspaper II by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP