अब के हम बिछड़े
Thursday, March 18, 2010
अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिलें
तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा
दोनों इन्साँ हैं तो क्यूँ इतने हिजाबों में मिलें
ढ़ूँढ़ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये ख़ज़ाने तुझे मुम्किन है ख़राबों में मिलें
ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें
आज हम दार पे खेंचे गए जिन बातों पर
क्या अजब कल वो जमाने को निसाबों में मिलें
अब ना वो मैं हूँ, ना तू है, ना वो माज़ी है फ़राज़
जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें
--- अहमद फ़राज़
(संदर्भ: http://www.urdupoetry.com/faraz02.html)
आजला दुरावता फक्त स्वप्नगाठ ना?
पुस्तकांत पाकळ्या सापडोत वाळल्या
तू नव्हे शिवा, न ही प्रीत ईशदूत वा
दोन जीव भेटले अडसरांत केवढ्या!
शोध भंगल्या उरी तू इमानमाणिके
ठेव ही मिळे तळी येथ धूळधाणल्या
ह्या व्यथांत गावच्या मैत्रशल्य जोड ना
वाढते नशा जरा मद्यमद्य मिसळता
ओढती सुळाकडे आज जीच कारणे
वाटतील ती उद्या ह्या जगास संपदा
आज मी न, तू न, तो कालही न आजला
भेटले जणू कुणी मृगजळी मनातल्या
10 comments:
मस्त जमलाय अनुवाद. विशेषतः शेवटचं कडवं मस्त जमलंय.
mehedi hasan ni faar surekh mhataliye hi gajal....mala faar aavadate....aani tuzya anuvaadacha shevatacha kadava masta zalay...
मला स्वतःला मेहन्दी हसन आणि ही गजल फार आवडते. पण आपण मागं बोलल्याप्रमाणं, मला गजल प्रकार फार कमी आवदतो. मराठीतल्या गजलांचा सगळ्यात मोठा लोचा म्हणजे गजलांचे टिपीकल विषय मराठीत एकदम निषिद्ध उदा दारु, प्रेम, शारीर वर्णन, देवाशी लगट इ इ. दुसरं म्हणजे मराठी एक भाषा म्हणून भयंकर ओबडधोबड आहे. त्यात काही कोमलपणे वर्णन करायला गेलं की विनोदच होतो! अपवाद एखादा ज्ञानेश्वर
"शब्दबंध" या मराठी ब्लॉगर्सच्या ई-अभिवाचनाच्या सभेबद्दल ऐकलं आहेस का? स्काईप कॉन्फ़रन्समध्ये मराठी ब्लॉगर्स एकत्र येऊन आपापल्या ब्लॉगवरील निवडक पोस्टांचं अभिवाचन करतात आणि त्यानंतर त्यावर चर्चा, गप्पा-गोष्टी होतात. "शब्दबंध"चं यंदा तिसरं वर्ष आहे.
http://marathi-e-sabha.blogspot.com
इथे अवश्य भेट दे. तुला सहभागी व्हायला आवडेल अशी आशा आहे. तुझ्या वाचनातल्या ब्लॉगलेखकांनाही या उपक्रमाबद्दल कळव. शब्दबंध टीमतर्फ़े त्यांनाही निमंत्रण.
धन्यवाद.
-प्रशांत
@ प्रशांत, मेघा,
धन्यवाद. आवडली हे वाटून बरं वाटलं. प्रयोग म्हणून हे भाषांतराचे प्रकार चाल्लेत. ही गझल मेहदी हसनच्या आवाजात मीही कितीही वेळा repeat mode मध्ये ऐकू शकतो.
हृदयनाथ मंगेशकरांना ह्यावरूनच ’मालवून टाक दीप’ची चाल सुचली, असं ऐकून आहे. जी माझी एक सर्वांत आवडती मराठी गझल आहे. ह्या भाषांतरीत गझलेचं वृत्त तिच्या जवळचं आहे, हा निव्वळ योगायोग नसावा. असो.
@ संवेद,
हं! तुझी गझलेविषयीची मतं माहीत आहेत, नि मी बर्याच अंशी सहमतही आहे. पण गझलेला विषयाचं बंधन नाही नि गझलेच्या रूढ पेक्षा अधिक पॉप्युलर विषयांचं मराठीला वावडं आहे, असाही काही नियम नाही, ना?
दुसरं म्हणजे मराठी एक भाषा म्हणून भयंकर ओबडधोबड आहे. त्यात काही कोमलपणे वर्णन करायला गेलं की विनोदच होतो!>>>>>>agadi agadi.......... sundar bhashantar ...!!!
जबरदस्त झालय हे ... सुभनल्लाह!
Beautifully translated.
मला शेवटचं कडवं भन्नाट आवडलं. जणू एखादं स्वप्नच पडलं असावं - त्याहून काही नाही.. असं म्हणणारी खिन्न भावना अचूक पोचलीये इकडून तिकडे.
मला सगळीच्या सगळी गझल नाही आवडली तेवढी, पण पूर्ण गझल इतक्या अचूकपणे नियमबियम पाळून आणि तीही ओढाताण न करता मराठीत आणणं - मानलं ब्वॉ.
@ लोपामुद्रा, संग्राम, तपस्या, मेघना,
आभार.
Post a Comment