स्तंभावरती चार सिंह

Monday, July 13, 2009

हल्ली तो कविता करतो
चार कडवी रोज लिहितो

एक कडवं शब्दांचं
कमळावरल्या थेंबांचं


दुसरं कडवं सुचलेलं
लोणच्यासारखं मुरलेलं

तिसरं सहज उमटतं
ध्रुवासारखं तळपतं

5 comments:

सर्किट said...

neeTasa kaLala nahi. chautha kaDava kuThe aahe? aaNi tya simhaanchaa kaay sandarbh?

Snehal Nagori said...

म्हणजे असं आहे का की चौथं कडवं पहिलंच आहे आणि ते चार सिंह कधीच दिसत नाहीत तीनच दिसतत पण असतात चार.....

Snehal Nagori said...

ए तू ती इंग्रजीची परिक्षा काढून टाक ना... जाम बोर होतं ती अक्षरं टाइप करत बसायला

Samved said...

दादांनुं, भारीच लिहलंसं त्वां!!

भायकु झाली आहे कविता- भारी-हायकु. भारी कारण हायकुपेक्षा मोठी आहे...काय बोर मारतोय मी..

छानच रे...

संवेद

a Sane man said...

सर्किटः
स्नेहल ची प्रतिक्रिया वाच.

स्नेहलः
हुशार आहेस तशी तू! :-)

संवेदः
धन्यवाद! भायकू..:D:D

Post a Comment

  © Blogger templates Newspaper II by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP